​अंजली फेम हर्षद आतकरी झळकणार फायलन डिसीजन या नाटकात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 08:59 AM2017-08-12T08:59:32+5:302017-08-12T14:29:32+5:30

दुर्वा या मालिकेत साकारलेल्या केशव या भूमिकेमुळे हर्षद आतकरी हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक ...

Anjali fame will be seen in Harshad Dutt | ​अंजली फेम हर्षद आतकरी झळकणार फायलन डिसीजन या नाटकात

​अंजली फेम हर्षद आतकरी झळकणार फायलन डिसीजन या नाटकात

googlenewsNext
र्वा या मालिकेत साकारलेल्या केशव या भूमिकेमुळे हर्षद आतकरी हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते आणि आता तो अंजली या मालिकेत झळकत आहे. या मालिकेतील त्याची भूमिकादेखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर आता हर्षद नाटकामध्ये झळकणार आहे. 
फायनल डिसीजन असे त्याच्या नाटकाचे नाव असून या नाटकाद्वारे तो रंगमंचावर पदार्पण करत आहे. हे नाटक अतिशय गंभीर विषयावर आधारित असल्याचे कळतेय. या नाटकाचे पोस्टर फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करून हर्षदने त्याच्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्याच्या नाटकाचा पहिला प्रयोग आज माटुंगा येथे होणार आहे. 
हर्षदने फेसबुकला शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये त्याच्याशिवाय आणखी दोन जण आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पोस्टमध्ये त्याच्यासोबत संजय खापरे आणि तोरल त्रिवेदी दिसत आहेत. तोरल त्रिवेदी ही गुजराती रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री असून या नाटकाद्वारे ती मराठीत पहिल्यांदाच झळकत आहे. या नाटकात प्रेक्षकांना काही गाणी देखील ऐकायला मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. या नाटकातील गाणी मंदार चोळकरने लिहिली असून शशांक पोवार यांनी या गाण्यांना संगीत दिले आहे. अनिल काकडे आणि अनिल पाकळे यांनी मिळून या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन हे अनिल काकडे यांचे आहे. त्यांच्या कळत नकळत या नाटकाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. 
हर्षदच्या या नव्या इनिंगसाठी त्याचे चाहते त्याला फेसबुकवर भरभरून शुभेच्छा देत आहेत. 

Also Read : ​कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायला आवडतं-हर्षद आतकरी

Web Title: Anjali fame will be seen in Harshad Dutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.