अमृता सुलतान खिलजीची दिवानी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 16:17 IST2018-02-19T10:47:18+5:302018-02-19T16:17:18+5:30

जिने आपल्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने सर्वांना घायाळ केलं अशी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरचे आज असंख्य फॅन आहेत. ...

Amrita Sultan Khilji diwani! | अमृता सुलतान खिलजीची दिवानी!

अमृता सुलतान खिलजीची दिवानी!


/>जिने आपल्या नृत्य आणि अभिनय कौशल्याने सर्वांना घायाळ केलं अशी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरचे आज असंख्य फॅन आहेत. मात्र ती पण कोणाची ना कोणाची फॅन असणारच हे जाणून घेण्याचीही रसिकांमध्ये अधिक उत्सुकता पाहायला मिळते.तर ती एका कलाकाराची मोठी चाहती आहे. हे तिच्या सोशल मीडिया अकाउंट्स वरूनच समोर आले आहे.जिचा अख्खा महाराष्ट्र दिवाना आहे ती दिवाणी आहे बॉलिवूडच्या सुलतान खिलजीची म्हणजेच रणवीर सिंगची मोठी चाहती असल्याचे समोर अाले आहे..नुकत्याच झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या कार्यक्रमात अमृताला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्याच कार्यक्रमात रणवीर सिंग सुद्धा हजेरी लावणार  हे अमृताला समजल्यावर तिची उत्सुकता शिगेला पोहोचली.या गोष्टीची दखल घेत रणवीर सिंग स्वतः अमृताला तिच्या व्हॅनिटीमध्ये भेटायला गेला आणि इतकाच नव्हे तर त्याच्या "खलिबली" या गाण्यावर डान्स सुद्धा  केला.अमृता आणि रणवीर यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुपचं वायरल झाल्याचे समजते.अमृताने तिची फॅन गर्ल मुव्हमेंट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.तिने रणवीरला थँक यु सुद्धा म्हंटलं आहे.नुकत्याच झालेल्या DID फायनलमध्ये अमृताने एक बहारदार नृत्य सादर केले.तसेच ती लवकरच मेघना गुलजार हिच्या "राझी" या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल सोबत  झळकणार आहे.
 
'राझी' या चित्रपटामध्ये आलिया भट्ट सोबत काम करत आहे. चित्रपटाची शूटिंग नुकतीच झाली असून हा चित्रपट तिच्यासाठी एक नाही तर अनेक कारणांमुळे खूप खास आहे.असे अमृताने तिच्या अनेक मुलाखतीत सांगितले आहे. मात्र की कारण आत्ताच सांगणार नाही त्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार असल्याचेही तिने आवर्जुन सांगितले.विशेष म्हणजे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया आणि अमृताची मैत्री अक वाढली हे देखील अमृताने आपल्या मुलाखतीत सतत म्हटले आहे. आणि ह्याचा ठोस पुरावा म्हणजे आलियाने अमृताला पाठवलेली एक भेटधिवस्तू!  ज्यात आलियाने स्वहस्ताक्षरात एक छोटेसे आभारपत्र आणि काही सुंदर भेटवस्तू अमृताला पाठवल्या. अमृता हे पाहून अगदी भारावून गेली,अमृताने सोशल मीडियावर ह्या बाबत पोस्ट केले आहे. 

Web Title: Amrita Sultan Khilji diwani!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.