अमृता खानविलकर का म्हणतेय हा माझा डान्स इंडिया डान्सच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 07:10 AM2017-12-29T07:10:47+5:302017-12-29T12:40:47+5:30

अमृता खानविलकर म्हणतेय हा माझा डान्स इंडिया डान्सच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. ...

Amrita Khanvilkar says that the last day of the filming of My Dance India Dance? | अमृता खानविलकर का म्हणतेय हा माझा डान्स इंडिया डान्सच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस?

अमृता खानविलकर का म्हणतेय हा माझा डान्स इंडिया डान्सच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस?

googlenewsNext
ृता खानविलकर म्हणतेय हा माझा डान्स इंडिया डान्सच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. अमृता खानविलकर ही एक खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगली सूत्रसंचालक आहे. त्यामुळे डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचे ती करत असलेले सूत्रसंचालन प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यामुळे हा माझा चित्रीकरणाचा शेवटचा दिवस असे तिने म्हटल्यामुळे तिच्या फॅन्सना नक्कीच वाईट वाटले असेल. पण हा केवळ तिचा या वर्षातील चित्रीकरणाचा शेवटचा दिवस आहे. तुमची लाडकी अमृता ही डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचा यापुढे देखील भाग असणार आहे. 
अमृताने डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाच्या टीमसोबत तिचा एक फोटो नुकताच ट्विटर या सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केला आहे. या पोस्टसोबत तिने एक खूप छान कॅप्शन लिहिले आहे. तिने म्हटले आहे, या वर्षातील डान्स इंडिया डान्सचे माझे शेवटचे चित्रीकरण होते. या वर्षांत डान्स इंडिया डान्सच्या या टीमला भेटून मला प्रचंड आनंद झाला. माझे वर्षं इतक्या चांगल्या क्षणावर संपत आहे त्यासाठी मी झी टिव्हीचे आभार मानते. पुढील वर्षी भेटूया. 
अमृताने पोस्ट केलेल्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तिच्या चाहत्यांनी या फोटोवर खूप सारे लाइक दिले असून अनेकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. तसेच या फोटोवर तिच्या फॅन्सनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अमृता ही खूप चांगली अभिनेत्री आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तिने फक्त लढ म्हणा, सतरंगी रे यांसारख्या मराठी चित्रपटात तर फूंक २, फूंक यांसारख्या हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. अमृता ही एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच एक चांगली डान्सर देखील आहे. तिने एकापेक्षा एक या कार्यक्रमात एकाहून एक सरस नृत्य सादर केले होते. वाजले की बारा या लावणीवरील तिच्या नृत्यावर तर तिचे फॅन्स अक्षरशः फिदा आहेत. नच बलिये या कार्यक्रमात देखील ती तिचे पती हिमांशू मल्होत्रासोबत सहभागी झाली होती आणि या कार्यक्रमाचे विजेतपद देखील तिला मिळाले होते. ती एक चांगली डान्सर असल्याचे बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी देखील या कार्यक्रमात म्हटले होते. 

Also Read : अमृता खानविलकरने शेअर केला फोटो,तर चाहत्यांनी दिल्या अशा कमेंट्स!

Web Title: Amrita Khanvilkar says that the last day of the filming of My Dance India Dance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.