Exclusive देवासाठी अमितराजची गजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 14:44 IST2016-08-24T09:14:23+5:302016-08-24T14:44:23+5:30
प्रियांका लोंढे अमितराजने नेहमीच वेगळ््याच पठडीतील संगीत देण्यासाठी जाणला जातो. अनेक मराठी चित्रपटांसाठी ...
.jpg)
Exclusive देवासाठी अमितराजची गजर
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">प्रियांका लोंढे
अमितराजने नेहमीच वेगळ््याच पठडीतील संगीत देण्यासाठी जाणला जातो. अनेक मराठी चित्रपटांसाठी अमितने लाजवाब संगीत दिले आहे. आवाज वाढव डीजे, गुलाबाची कळी, देवा काळजाची हाक एक एकदा तरी.... याप्रकारची प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहतील अशी गाणी अमितने आजपर्यंत केली आहेत. आता पुन्हा एकदा अमित नवीन प्रकारचे संगीत देण्याच्या तयारीला लागला आहे. देवा या आगामी चित्रपटासाठी अमितराज गजर नावाचा नवीन संगीतप्रकार पहिल्यांदाच मराठीत घेऊन येणार आहे. याबद्दल अमितराजने सीएनएक्सला या संगीत प्रकाराविषयी माहिती दिली. अमित म्हणाला, गजर हा संगीतप्रकार तसा मराठी चित्रपटांमध्ये दिसत नाही. मी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत गजर आणणार आहे. हा प्रकार कोकणात जास्त वापरला जातो. देवा हा चित्रपट मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. आणि यामध्ये कोकण दाखविण्यात आलाय त्यामुळे मी गजर असलेले ेक गाणे चित्रपटात घेतले आहे. गजर म्हणजे देवाचे एका विशिष्ठ स्वरात नामस्मरण करणे. गजर गाण्यासाठी आवाजातील चढउतार फार महत्वाचे असतात. गजर गाताना ती थेट प्रेक्षकांच्या मनाला जाऊन भिडली पाहिजे. या चित्रपटासाठी मी एकुण चार गाणी केली आहेत. आदर्श शिंदेंचा आवाज काही गाण्यांसाठी असेल. अमितराजने देवासाठी केलेली ही गजर रसिकांच्या काळजाला किती भिडते ते आपल्याला लवकरच समजेल्