बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आहे ‘पॅडमॅन’ तर मराठीतही 'ही'ठरली ‘पॅडवुमन’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 09:47 AM2018-03-08T09:47:23+5:302018-03-08T15:17:23+5:30

‘मासिक पाळी’ हा असा शब्द आहे जो आजही उच्चारताना विचार केला जातो.अजूनही तितक्या खुल्या पध्दतीने याविषयी बोललं जातंच असं ...

Akshay Kumar is' Padman 'in Bollywood and' Padavuman 'in' | बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आहे ‘पॅडमॅन’ तर मराठीतही 'ही'ठरली ‘पॅडवुमन’

बॉलिवूडमध्ये अक्षय कुमार आहे ‘पॅडमॅन’ तर मराठीतही 'ही'ठरली ‘पॅडवुमन’

googlenewsNext
ासिक पाळी’ हा असा शब्द आहे जो आजही उच्चारताना विचार केला जातो.अजूनही तितक्या खुल्या पध्दतीने याविषयी बोललं जातंच असं नाही.आपण २१व्या शतकात वावरतोय त्यामुळे याविषयी काहीजण अगदी बिनधास्तपणे आपले मत व्यक्त करताना दिसतात.आणि खरं तर ते योग्यच आहे.प्रत्येक मुलीच्या, महिलांच्या आयुष्यातील ही महत्त्वाची पायरी असते. त्यामुळे पाळी आणि त्यासंबंधीची स्वच्छता ही सर्वांना ठाऊक असणे आवश्यक आहे.वयात आल्यानंतर दर महिन्याला मासिक पाळी सुरु होते. चार ते पाच दिवस हा मासिक पाळीचा कालावधी असतो.या दरम्यान शारिरीक, मानसिक त्रास होतो, स्वभावात बदल होतो जसे की चिडचिड होते.वयात आल्यानंतर मासिक पाळी सुरु होणे याबाबतीत अनेक मुलींमध्ये भीती असते.अर्थात त्यांच्यासाठी ही पहिलीच वेळ असते. त्यामुळे त्यांना पाळीविषयी आई, मावशी, शिक्षक, बहिण यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते.

मासिक पाळीविषयी आणि त्याच्या स्वच्छतेबद्दल मुलींना माहिती व्हावी म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री ऋता दुर्गुळेने मालाड येथील जिजामाता विद्या मंदिर येथील विद्यार्थींनीसाठी एक कार्यक्रम राबविला.ज्यामध्ये विद्यार्थींनीना मासिक पाळीविषयी आणि सॅनिटरी नॅपकीनविषयी मार्गदर्शन करण्यात आले.ऋता दुर्गुळेसोबत कौन्सिलर देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मुलींचे मार्गदर्शन केले.पाळी म्हणजे काय हे समजावून सांगून,नेमकं काय घडतं आणि कशा पध्दतीने स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे हे समजावून सांगितले.गप्पा-गोष्टींच्या स्वरुपात माासिक पाळीविषयी विद्यार्थींनीसोबत संवाद झाल्यानंतर ऋता दुर्गुळेने सॅनिटरी नॅपकिन्सचेही वाटप केले.

नुकताच प्रदर्शित झालेल्या अभिनेता अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ने सॅनिटरी नॅपकिन्स या विषयावर भाष्य करुन हा विषय रसिकांना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला.या चित्रपटामुळे अनेक जण नक्कीच प्रेरित झाले असतील, विशेष म्हणजे त्यामध्ये ऋता देखील सामील आहे.‘पॅडमॅन’ या चित्रपटाने ऋताला प्रेरित केले आणि त्यामुळे आपणही असे महत्त्वपूर्ण पाऊल उचलावे असे ठरवून ऋताने महिला दिनाच्या निमित्ताने शाळेतल्या मुलींसोबत सॅनिटरी नॅपकिन्सशी संबंधित संवाद साधला.मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकिन याविषयी बोलण्यात कोणताही कमीपणा वाटून घेऊ नये आणि हल्ली या विषयवार खुल्या पध्दतीने चर्चा होतात.हेच या चर्चासत्रामुळे  पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. अशाप्रकारे विद्यार्थीनींचे मासिक पाळी आणि त्यासाठी घ्यावी लागणारी स्वच्छतेची काळजी याविषयी माहिती देऊन ऋता दुर्गुळेने यंदाचा महिला दिन आनंदाने साजरा केला. 

Web Title: Akshay Kumar is' Padman 'in Bollywood and' Padavuman 'in'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.