'... त्यानंतर मी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला'; कोकण हार्टेड गर्ल अंकिताचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 12:57 PM2023-07-08T12:57:14+5:302023-07-08T12:57:43+5:30

Ankita Walawalkar : कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या अंकिता वालावलकर सतत चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या खाजगी आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

'... after that I decided to run away and get married'; Shocking revelation of Konkan hearted girl Ankita | '... त्यानंतर मी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला'; कोकण हार्टेड गर्ल अंकिताचा धक्कादायक खुलासा

'... त्यानंतर मी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला'; कोकण हार्टेड गर्ल अंकिताचा धक्कादायक खुलासा

googlenewsNext

कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या अंकिता वालावलकर सतत चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या खाजगी आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने घर सोडून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यानंतर काय घडले, याबद्दलही तिने खुलासा केला.

अंकिताच्या घरी सुरुवातीपासूनच खूप शिस्तीचे वातावरण होते. ज्याचा तिला कंटाळा आला होता. त्या दरम्यान तिच्या आयुष्यात एक मुलगा आला. जो तिची काळजी घेत होता, लाड करत होता. चॉकलेट आणत होता, सिनेमाला घेऊन जात होता. त्यामुळे तिला आपल्यासाठी आपले आईबाबा काहीच करत नाहीत, अशी भावना निर्माण झाली. त्यामुळे ती आई बाबांना उलट उत्तर द्यायला लागली. इतकेच नाही तर तिने त्यावेळी तिच्या आईबाबांना, तुम्ही माझ्यासाठी काय केलंय? असा प्रश्न विचारला होता. याबद्दल ती सांगते की, मी जेव्हा वयाने ११ वर्षे मोठ्या असलेल्या मुलाच्या प्रेमात होते, तेव्हा एक क्षण असा आला ज्यावेळी मला माझ्या घरच्यांचा खूप राग आला. त्यांचा कंटाळा आलेला तेव्हा मी त्याला भेटले आणि आपण लग्न करूया असं म्हणाले. त्याचवेळी माझ्या आईला कुणीतरी सांगितलं की अंकिताने लग्न केले. त्यावेळी मी लग्न केलेच नव्हतं पण माझ्या भावाच्या एक्स गर्लफ्रेंडने ही अफवा सगळीकडे पसरवली. माझी आई मला शोधत तिथे येणार म्हणून मी त्या मुलाच्या घरी जाऊन राहिले. कारण मी आता १८ वर्षांची झालेली होते आणि मला काय करायचं ते मी करू शकते असा त्यावेळी आत्मविश्वास होता. मी आंधळ्या प्रेमात होते त्यामुळे आईवडिलांची मला अजिबातच किंमत नव्हती.

प्रेम बिम काही नसते याची जाणीव झाली
ती पुढे म्हणाली की, त्या मुलाचा जॉब मुंबईत असल्यामुळे त्याला तिथे जावे लागले होतं पण मी त्याच्याच घरी राहून माझे पुढचे शिक्षण पूर्ण केले. सहा सात महिने मी तिथे राहिले पण आता त्या कृत्याची जाणीव मला होतेय की आईबाबांना त्यावेळी काय वाटत होते. या सगळ्यात माझे त्या मुलाशी लग्न होईल किंवा नाही ती गोष्ट वेगळी होती पण त्याची आई मात्र माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. त्यांनी माझे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठिंबा दिला होता. पण दीड महिन्यातच मला जाणीव झाली की प्रेम बिम काही नसते, आईवडीलच सर्वस्व असतात. पण त्यानंतर परत कसे जायचे म्हणून माझ्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता. माझ्या बाबतीत सगळ्यांना माहीत झाले होते त्यामुळे त्या चार लोकांना मी कुठल्या तोंडाने उत्तर देणार असे प्रश्न मनात येत होते. एक-दीड वर्ष गेले त्यात मी शिव्या खाल्ल्या, मार खाल्ला.

लग्न झालं नसलं तरी ती माझी सासूच होती
तू काहीच करू शकणार नाहीस, तुला इंजिनिअरिंगला सुद्धा कमी मार्क्स मिळताहेत. तू फक्त भांडीच घासशील असे जेव्हा लाईफ पार्टनरच आपल्याबद्दल असं बोलायला लागतो तेव्हा तुम्ही डिमोटिव्हेट होता आणि तेच माझ्याबाबतीत सतत होत राहिलं. पण मी एक म्हणेन की माझं त्याच्यासोबत लग्न जरी झालं नव्हतं तरी ती माझी सासूच होती, तिने मला प्रेरणा दिली. ती माझ्यासाठी आईच होती. पण दोन वर्षानंतर सतत त्याच त्याच गोष्टी पाहून मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. तो मुलगा छान वागेल माझ्याशी हा विचार यायचा पण तसं मुळीच घडत नव्हतं. शेवटी आईवडील आपल्याला पुन्हा घरात घेतील की नाही ही धाकधूक होती, पण आई वडिलांनी मला समजावून घेतलं. दोन वर्षानंतर त्यांना कळलं की मी त्या मुलाशी लग्न केलं नव्हते, असे तिने सांगितले. 

पालकांनी मुलींच्या बाजूने उभे राहिले पाहिजे
आम्ही दोघे आता रिलेशनशिपमधून बाहेर पडलोय पण कधीच एकमेकांच्या विरोधात कोणाजवळ बोललो नाही. पण जिथे मी आता लोकप्रिय झाली आहे तेव्हा काही लोक जाणून बुजून जुन्या गोष्टी उकरून काढण्याचा प्रयत्न करतात. मी या गोष्टी मुद्दामहून लोकांसमोर आणल्या आहेत. जेव्हा माझ्या या गोष्टी लोकांना समजल्या तेव्हा अनेकांनी खूप छान प्रतिक्रिया दिल्या. एका मुलीची आई तर सांगत होती की माझी मुलगी चुकली आणि तिने हा व्हिडीओ पाहिला तेव्हा ती आईजवळ ढसाढसा रडली होती. मुली चुकतात, धडपडतात पण एक गोष्ट आहे की पालकांनी त्यांच्या बाजूने उभं राहायला हवं. तिला त्यातून बाहेर पडायला प्रोत्साहन द्या, असे अंकिता सांगते.  

Web Title: '... after that I decided to run away and get married'; Shocking revelation of Konkan hearted girl Ankita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.