हिंदी नाटकानंतर आता मराठीत ही रंगणार 'दिल तो बच्च है जी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 13:10 IST2017-08-03T07:26:15+5:302017-08-03T13:10:20+5:30

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा 'दिल तो बच्चा है जी' हा सिनेमा बराच गाजला होता.या सिनेमाचं शीर्षक गीत ...

After the Hindi play, now it will be playing 'Dil To Bachch Hai Ji' in Marathi | हिंदी नाटकानंतर आता मराठीत ही रंगणार 'दिल तो बच्च है जी'

हिंदी नाटकानंतर आता मराठीत ही रंगणार 'दिल तो बच्च है जी'

लिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा 'दिल तो बच्चा है जी' हा सिनेमा बराच गाजला होता.या सिनेमाचं शीर्षक गीत दिल तो बच्चा है जी हे बरंच लोकप्रिय झालं होतं. रोमँटिक कॉमेडी पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा चांगलाच लोकप्रिय ठरला होता. प्रेम, रोमान्स यावर भाष्य करणारे अनेक सिनेमा रुपेरी पडद्यावर आले आहेत. रंगभूमीही याला अपवाद राहिलेली नाही. लव्ह स्टोरी आणि रोमान्सवर आधारित बरीच नाटकं रंगभूमीवर गाजली आहेत. दिल तो बच्चा है जी या हिंदी सिनेमाप्रमाणे हिंदी नाटकही तितकंच फॉर्मात रंगभूमीत सुरु आहे. धीरज पालशेतकर दिग्दर्शित या नाटकात प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता अली असगर, संजय भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता मराठी रंगभूमीवरही प्रेमाची गोष्ट फुलणार आहे. प्रेम आणि रोमान्सची गोष्ट सांगणा-या आगामी नाटकाचं नाव दिल तो बच्चा है जी असं आहे. अशोक दगडू शिगवण प्रस्तुत आणि तृप्ती प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या नाटकाचं लेखन अक्षय जोशी यांनी केलं आहे. या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसाद खांडेकर यांनी पेलली आहे. या नाटकात तगडी स्टारकास्टही आहे.पंढरीनाथ कांबळी, प्रसाद खांडेकर, रसिका वेंगुर्लेकरसह कलाकारांची दमदार फौज या नाटकाच्या माध्यमातून मराठी नाट्य रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत.छोट्या पडद्यावरील 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेमधील प्रगल्भा, 'फ्रेशर्स' मालिकेत रेणुका ही व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर या नाटकात खास भूमिकेत पाहायला मिळणार आहे.त्यामुळे या नाटकासाठी बरीच एक्साईटेड आहे. दिल तो बच्चा है जी या आपल्या आगामी नाटकाचा फोटो रसिकानं सोशल नेटवर्किंग साईटवर फॅन्ससह शेअर केलाय.या नाटकासाठी उत्सुक असल्याचे तिने या फोटोसह ट्विट केलंय. प्रेम, लव्हस्टोरी यावर आधारित हे नाटक असल्याने नाटकाचं संगीतही तितकंच रोमँटिक असणार आहे. त्यामुळेच या नाटकाला अमीर हडकर यांचं संगीत लाभलंय. संदेश हडकर यांनी या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी उचलली आहे. त्यामुळे प्रेम आणि रोमान्सची गोष्ट मराठी रंगभूमीवर अनुभवण्यासाठी सज्ज व्हा.   

Web Title: After the Hindi play, now it will be playing 'Dil To Bachch Hai Ji' in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.