आदिनाथ आणि तेजसने दिल्या गौतम राजाध्यक्ष यांच्या आठवनींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:22 IST2016-10-15T16:36:22+5:302016-10-15T17:22:22+5:30

प्राजक्ता चिटणीस / मुंबई आदिनाथ कोठारेने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात 2010 मध्ये केली होती. त्याने त्याच्या कारकिर्दच्या सुरुवातीला त्याचे पहिले ...

Adinath and Tejas gave a surprise to Gautam Raja | आदिनाथ आणि तेजसने दिल्या गौतम राजाध्यक्ष यांच्या आठवनींना उजाळा

आदिनाथ आणि तेजसने दिल्या गौतम राजाध्यक्ष यांच्या आठवनींना उजाळा

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">प्राजक्ता चिटणीस / मुंबई

आदिनाथ कोठारेने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात 2010 मध्ये केली होती. त्याने त्याच्या कारकिर्दच्या सुरुवातीला त्याचे पहिले फोटोशूट  प्रसिध्द फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांच्यासोबत केले होते. गौतम राजाध्यक्ष सारख्या महान फोटोग्राफर सोबत फोटोशूटचा त्याचा अनुभव हा अविस्मरणीय असल्याचे तो सांगतो. या फोटोशूटच्यावेळी आजचा आघाडीचा फोटोग्राफर तेजस नेरुरकर हा त्यांचा सहाय्यक होता. या फोटोशूटपासूनच आदिनाथ आणि तेजसची खूपच चांगली मैत्री जमली आहे. तेजस आणि आदिनाथने गौतम राजाध्यक्ष यांच्या  जयंतीला म्हणजेच 16 सप्टेंबरला एक खास फोटोशूट केले. या फोटोशूटल त्या दोघांनी गौतम राजाध्यक्ष यांच्या आठवणींना उजाळा दिला. या फोटोशूटचे वैशिष्ट्य म्हणजे गौतम यांनी ज्या पोज मध्ये आदिनाथचा एक फोटो काढला होता  त्याच पोजमध्ये तेजसने आदिनाथचा  फोटो काढला. याविषयी आदिनाथ सांगतो, "गौतम राजाध्यक्ष यांनी आपले फोटो काढावेत अशी अनेकांची इच्छा असायची. पण हे स्वप्नं पूर्ण होणे हे सगळ्यांसाठी शक्य नसते. पण मला त्यांच्यासोबत फोटोशूट करायला मिळाले होते. माझे त्यांनी काढलेले फोटो खूपच सुंदर आले होते. तेजसदेखील खूपच चांगले फोटो काढतो. त्यामुळे तेजस या त्यांच्या शिष्याने आणि मी त्यांच्या जयंतीला फोटोशूट केले. तेजसनेदेखील त्याच पोजमध्ये माझा खूप छान फोटो काढला आहे."




गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेला फोटो




फोटोग्राफर तेजस नेरुरकरने काढलेला फोटो
 

Web Title: Adinath and Tejas gave a surprise to Gautam Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.