​आकाशची दुसरी हिरोईन असेल ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 16:24 IST2016-06-18T10:54:57+5:302016-06-18T16:24:57+5:30

सैराटच्या विलोभनिय यशामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला परशा म्हणजेच आकाश ठोसर आता मराठीतील सुप्रसिद्ध निमार्ता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर यांच्या आगामी ...

Actor will be the second heroine of the sky | ​आकाशची दुसरी हिरोईन असेल ही अभिनेत्री

​आकाशची दुसरी हिरोईन असेल ही अभिनेत्री

राटच्या विलोभनिय यशामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला परशा म्हणजेच आकाश ठोसर आता मराठीतील सुप्रसिद्ध निमार्ता-दिग्दर्शक-अभिनेता महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. याच्या चित्रीकरणासही आता जोरात सुरुवात झाली आहे. सैराट चित्रपटात आपल्याला आकाश आणि रिंकूची जोडी पाहावयास मिळाली.

आकाशच्या दुसºया चित्रपटाबाबत सर्वांनाच ही उत्सुकता आहे की, त्याची हिरोईन कोण असेल. बºयाचजणांनी हा अंदाजदेखील लावला की, त्याच्या दुसºया चित्रपटातही रिंकूच हिरोईन असेल, मात्र रिंकूचे यंदा दहावीचे वर्ष असल्याने तिला अभ्यासात लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे आता त्याच्या दुस-या चित्रपटात कोणती अभिनेत्री झळकणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. 

तर आकाशच्या या चित्रपटात अभिनेत्री माधुरी देसाई दिसणार असल्याचे समजते. येक नंबर या मालिकेने माधुरीला प्रसिद्धी मिळाली. गेल्या एप्रिल महिन्यात ही मालिका बंद झाल्यानंतर माधुरी तिच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाची कथा आजच्या तरुणाईचे राहणीमान आणि त्यांच्या बोलण्याची पद्धत यावर भाष्य करणारी असल्याचे कळते. महेश मांजरेकर दिग्दर्शित ''FU'' या चित्रपटात त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर, आकाश ठोसर, संस्कृती बालगुडे आणि माधुरी देसाई यांच्या भूमिका आहेत.

Web Title: Actor will be the second heroine of the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.