अभिनेत्री समिधा गुरू ठरली विविध पुरस्कारांची मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 16:24 IST2018-03-14T10:54:28+5:302018-03-14T16:24:28+5:30

कलाकारांच्या कामाचं त्यांच्या चाहत्यांकडून नेहमीच कौतुक होत असतं. या कौतुकामुळेच त्यांना अजून चांगल काम करण्याची प्रेरणा मिळते, तसेच केलेल्या ...

Actor Samitha Guru was honored by various awards | अभिनेत्री समिधा गुरू ठरली विविध पुरस्कारांची मानकरी

अभिनेत्री समिधा गुरू ठरली विविध पुरस्कारांची मानकरी

ाकारांच्या कामाचं त्यांच्या चाहत्यांकडून नेहमीच कौतुक होत असतं. या कौतुकामुळेच त्यांना अजून चांगल काम करण्याची प्रेरणा मिळते, तसेच केलेल्या कामासाठी पुरस्कार मिळाणे हे त्यांच्या कामाला सन्मानित करण्यासारखचं आहे.

अशीच एक मराठी तारका समिधा गुरू हिला 2017 -18 या वर्षात विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 6वा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये तिला ‘माझं भिरभिरं’ या चित्रपटासाठी विश्वास नांगरे पाटील आणि नितीन देसाई यांच्या हस्ते उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी पुरस्कार मिळाला. तसेच चित्र भारती फिल्म फेस्टीवल, दिल्ली आणि मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये ही ‘अनाहूत’ या शॉर्टफिल्मसाठी तिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले आहे.

याविषयी बोलताना समिधा म्हणाली की, पुरस्कार मिळणे म्हणजे त्या कलाकाराचं आणि त्यांच्या कामाचं केलेलं कौतुकच असतं. मला उत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद होतोय. तसेच पॉप्यूलर फिल्म ऑफ द इयर या नामांकनासाठी ‘अनाहूत’ या शॉर्टफिल्मला फिल्म फेअर अवॉर्ड मिळणे ही माझ्यासाठी तेवढीच अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या कामासाठी मला कुसुमताई चव्हाण स्मृती महिला भूषण पुरस्कार मिळाला तेव्हा हा आनंद व्दिगुणित झाला. आपलं काम लोकांना आवडतयं हे जास्त सुखावणारं आहे. 

Web Title: Actor Samitha Guru was honored by various awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.