Jaggu Ani Juliet : ‘जग्गू आणि जुलिएट’ची भन्नाट केमिस्ट्री आजपासून रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 03:56 PM2023-02-10T15:56:31+5:302023-02-10T16:00:19+5:30

‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची घोषणा झाली, त्या दिवसापासूनच हा चित्रपट ट्रेंड होतोय. अमेय वाघ-वैदेही या सुपरक्यूट जोडीची सुपरक्युट केमिस्ट्री पाहण्यास सगळेच उत्सुक होते.

Actor Amey Wagh and Vaidehi Parshurami's Jaggu Ani Juliet marathi movie released today | Jaggu Ani Juliet : ‘जग्गू आणि जुलिएट’ची भन्नाट केमिस्ट्री आजपासून रुपेरी पडद्यावर

Jaggu Ani Juliet : ‘जग्गू आणि जुलिएट’ची भन्नाट केमिस्ट्री आजपासून रुपेरी पडद्यावर

googlenewsNext

अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parshurami) यांचा चित्रपट जग्गू आणि ज्युलिएट (Jaggu Ani Juliet)प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महेश लिमयेंचं जबरदस्त दिग्दर्शन आणि अमेय वाघ-वैदेही या सुपरक्यूट जोडीची सुपरक्युट केमिस्ट्री पाहण्यास सगळेच उत्सुक होते. प्रेक्षकांची प्रतिक्षा आज संपली आहे. पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाची घोषणा झाली, त्या दिवसापासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. तसेच हा चित्रपट अजय-अतुल यांची म्युझिकल ट्रीट असल्याने यातील गाणी चित्रपट रिलीज होण्याआधीच लोकप्रिय झाली.  चित्रपटातील ‘भावी आमदार’ या गाण्याने तब्बल ३ मिलियन व्हयूजचा टप्पा पार केला आहे.

चित्रपटात अमेय वाघ हा वर्सोव्यामधील एका आग्री-कोळी मुलाची अर्थात जग्गूची भूमिका साकारत आहे. तर वैदेही ही ज्युली नावाच्या उच्चशिक्षीत मुलगी दाखवण्यात आली आहे. दोन भिन्न स्वभावाच्या आणि समाजाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आलेले जग्गू आणि जुलिएट एकमेकांच्या कसे प्रेमात पडतात, त्यांच्या प्रेमात रंग भरण्यासाठी इतर पात्रं काय काय करामती करतात हे सिनेमात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.  

अमेय-वैदेहीसोबतच हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौगुले, अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत वाडकर, केयुरी शाह अशा जबरदस्त कलाकारांची फौज चित्रपटात आहे. 


 

Web Title: Actor Amey Wagh and Vaidehi Parshurami's Jaggu Ani Juliet marathi movie released today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.