मराठी सेलीब्रिटींच्याफेव्हरेट गोष्टी
By Admin | Updated: August 17, 2016 03:01 IST2016-08-17T03:01:53+5:302016-08-17T03:01:53+5:30
प्रत्येकालाच एखादी लकी गोष्ट कायम आपल्यासोबत असावी असे वाटते. मग काही जण अंगठ्या घालतात तर काही जण ठरावीक रंग वापरतात.

मराठी सेलीब्रिटींच्याफेव्हरेट गोष्टी
प्रत्येकालाच एखादी लकी गोष्ट कायम आपल्यासोबत असावी असे वाटते. मग काही जण अंगठ्या घालतात तर काही जण ठरावीक रंग वापरतात. विशिष्ट रंगाचे कपडे घातले तर नक्कीच चांगली गोष्ट घडेल असे त्यांना वाटत असते. चंदेरी दुनियेतील ताऱ्यांचेही असेच काही आहे. बऱ्याचदा आपण पाहतो, की कलाकार त्यांच्या नावात बदल करतात किंवा गाड्यांचे नंबरदेखील अंकशास्त्रानुसार वापरतात. सलमान खानचे लकी फिरोजा ब्रेसलेट तर सर्वांनाच माहीत आहे. असेच काही लकी चार्म्स मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांचेदेखील आहेत. याच कलाकारांसाठी कोणत्या गोष्टी लकी आहेत त्या आपणही जाणून घेऊयात.
स्मिता जयकर
हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केलेल्या स्मिता जयकर यांचा स्क्रीस्टलच्या गोष्टींवर जास्त विश्वास आहे. त्या अनेकदा स्क्रीस्टलच्या वस्तू वापरतात.
किशोरी शहाणे
मराठी चित्रपटसृष्टीच्या ऐंशी व नव्वदचा काळ आपल्या अभिनयशैलीने गाजविलेली अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. किशोरी शहाणे यांच्या बोटातदेखील एक साईबाबाची अंगठी आपल्याला दिसते. त्यांच्या पतीने ही अंगठी त्यांना दिली आहे. अनेक वर्षांपासून त्या ही अंगठी बोटात घालतात.
स्वप्निल जोशी
‘चॉकलेट बॉय’ असे बिरुद मिरविणारा स्वप्निल जोशीदेखील लकी चार्म्सवर विश्वास ठेवतो असेच वाटते. काही दिवसांपासून त्याच्या गळ्यात रुद्राक्ष पाहायला मिळतो आहे. एवढेच काय, तर स्वप्निल त्याच्या नावात दोन डब्ल्यू लावतो. तुम्ही जर सोशल साइट्सवर स्वप्निल जोशीला सर्च केले तर त्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये तुम्हाला दोन डब्ल्यू पाहायला मिळतील. त्याचबरोबर रूद्राक्ष हे माझ्या गळ्यात गेली चार ते पाच वर्षांपासून असून माझ्यासाठी माझी स्माईलच लकी चार्म्स आहे, असे तो सांगतो.
मनवा नाईक
चित्रपट, मालिकांमधून आज स्वत:ची ओळख निर्माण केलेली अभिनेत्री मनवा नाईक नुकतीच आपल्याला ‘पिंडदान’ या चित्रपटात पाहायला मिळाली. पिंडदान चित्रपटाच्या प्रमोशन वेळी जेव्हा मनवा आली तेव्हा ती वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाली. मनवाने पायात या वेळी एक मोठे जाड सोनेरी रंगाचे कडे घातलेले होते. हे कडे फॅशन म्हणून घातले असते तर ठीक, परंतु पिंडदान या सिनेमातदेखील मनवाच्या पायात हे कडे पाहायला मिळत आहे. या कड्याविषयी मनवा म्हणते, ‘‘माझ्या आईने मला चांदीचे लवचीक असे कडे दिले होते. पण ते तुटण्याच्या भीतीमुळे मी सेम असेच कडे एका प्रदर्शनातून घेतले आहे. हे कडे नेहमी माझ्या पायात असते.
सिद्धार्थ चांदेकर
मराठी चित्रपटसृष्टीत सिद्धार्थ चांदेकर स्वत:ची ओळख निर्माण करीत आहे. नुकतेच त्याचे ‘पिंदडान’ आणि ‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यातील ‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’ या चित्रपटात सिद्धार्थच्या हातात एक सिल्वर कलरचे कडे पाहायला मिळते. हे कडे सिद्धार्थ फक्त चित्रपटातच नाही तर इतर वेळीदेखील वापरतो. सिद्धार्थला हे चांदीचे कडे त्याच्या आईने दिवाळीला गिफ्ट दिल्याचे तो सांगतो. हातात छान दिसत असल्याने कोणीच ते कडे त्याला काढायला सांगत नाही. त्यामुळे पुढील काही चित्रपटांमध्ये हे कडे सिद्धार्थच्या हातात असणार आहे.