मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक वळतील

By Admin | Updated: April 8, 2015 06:14 IST2015-04-08T01:51:25+5:302015-04-08T06:14:08+5:30

ही चांगली कल्पना आहे आणि त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगला वाव मिळेल. प्राइम टाइमला जाऊन जे लोक हिंदी सिनेमा बघतात,

Marathi audiences turn to Marathi cinema | मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक वळतील

मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक वळतील

मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइम देण्याचा आदेश राज्य सरकारतर्फे देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे चित्रपटसृष्टीतर्फे स्वागत करण्यात आले.

ही चांगली कल्पना आहे आणि त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगला वाव मिळेल. प्राइम टाइमला जाऊन जे लोक हिंदी सिनेमा बघतात, त्यांना मराठी सिनेमा बघण्याचा पर्याय उपलब्ध होईल. अनेकदा खूप इच्छा असूनही मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या वेळांमुळे अनेकांना ते बघायला मिळत नाहीत. बऱ्याचवेळा चित्रपटगृहात लागलेल्या हिंदी सिनेमापेक्षा मराठी सिनेमा चांगला असतो. पण प्राइम टाइम नसल्याने तो पाहिला जात नाही. - सतीश राजवाडे, दिग्दर्शक

हा निर्णय अतिशय चांगला आहे. ६ ते ९ या वेळेचा मराठी चित्रपटांना नक्कीच फायदा होईल. योग्य दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. - तुषार दळवी,

अभिनेता ६ ते ९ हा प्राइम टाइम मुंबई-पुण्यापर्यंत मर्यादित आहे. बाहेरगावी ही वेळसुद्धा महिलांसाठी अडचणीची असते. पण मुंबई-पुण्याच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. मराठी चित्रपटांच्या बाबतीत सरकार असेच कडक राहिले, तर त्याचा मराठी चित्रपटांना फायदाच होईल. म्हणजे यात इतर कुणाला ढवळाढवळ करता येणार नाही. - अलका कुबल, अभिनेत्री

मराठी चित्रपटांच्या बाबतीत मल्टिप्लेक्समध्ये जो दुजाभाव केला जातो, तो आता संपेल. मराठी चित्रपटाला पैसे मिळाले, तर चित्रपट अधिक पुढे येऊ शकतो आणि त्यासाठी प्राइम टाइम हा महत्त्वाचा आहे. हे गरजेचेच होते. हा निर्णय उत्तम आहे. याचा फायदा कळकळीने जे मराठी चित्रपट बनवतात त्यांना होईलच; मात्र याचा कुणी गैरफायदा घेऊ नये, असे वाटते. - किशोर कदम, अभिनेता

हा निर्णय उत्कृष्ट आहे. प्रेक्षक खरा तर याच वेळेचा असतो. ही घोषणा आता प्रत्यक्षात राबवली गेली पाहिजे. - अरु ण नलावडे, अभिनेता

सरकारला आपण हे सांगतच होतो, आता शिक्कामोर्तब झाले आहे. प्राइम टाइमला मराठी चित्रपट लागले तर मराठी चित्रपट अधिक चालतील. एका मल्टिप्लेक्समध्ये अनेक स्क्रीन असल्याने इतर कुणी याला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. मराठी चित्रपट सध्या एवढा चालतोय की अनेकदा हिंदी चित्रपटांना त्यासाठी खाली उतरवावे लागते. मराठी चित्रपटांना ही वेळ देण्याचा निर्णय हे उत्तम चिन्ह आहे. - जयवंत वाडकर, अभिनेता

प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवले जाणार या बातमीने खूप आनंद झाला आहे. माझ्या आगामी ह्यकांकणह्ण या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर हा आनंद द्विगुणित झाला आहे. मलाच नाही, तर संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला या निर्णयाचा फायदा होईल. या निर्णयामुळे मराठी सिनेमाला अधिक शो मिळतील. - क्र ांती रेडकर, अभिनेत्री

सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे. मराठी चित्रपटांच्या बिझनेसच्या दृष्टीने आनंदाचा निर्णय आहे. - जितेंद्र जोशी, अभिनेता

६ ते ९ वेळ मिळणे हा फक्त हक्क नाही, ही एक जबाबदारी आहे.. निर्मात्यांनी दर्जेदार सिनेमा तयार करायची आणि प्रेक्षकांनी मराठी सिनेमाला गर्दी करण्याची! - अंबर हडप, लेखक

मला मराठी चित्रपट पाहायला आवडतात. मात्र कोणता चित्रपट केव्हा बघायचा ते मीच ठरवेन. ही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दादागिरीच आहे. आता मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न मिळणेही बंद होणार का? मराठी चित्रपटांना प्राइम टाइम देण्याबरोबरच चित्रपटगृहांत आता ह्यवडापावह्ण आणि ह्यदही-मिसळह्णसुद्धा मिळेल का? - शोभा डे, लेखिका

Web Title: Marathi audiences turn to Marathi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.