मानसी नाईक होणार आई!
By Admin | Updated: August 20, 2015 23:47 IST2015-08-20T23:47:06+5:302015-08-20T23:47:06+5:30
मराठी नायिका मानसी नाईक हिच्या नव्या इनिंगला सुरुवात होतेय, असे म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत विविध मराठी सीरिअल्स आणि चित्रपटांतून भूमिका

मानसी नाईक होणार आई!
मराठी नायिका मानसी नाईक हिच्या नव्या इनिंगला सुरुवात होतेय, असे म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत विविध मराठी सीरिअल्स आणि चित्रपटांतून भूमिका साकारलेली ही अभिनेत्री आपल्या आगामी चित्रपटात चक्क आईची भूमिका साकारतेय. दिग्दर्शक रोहन यांच्या आगामी ‘द शॅडो’ या हॉरर, थ्रिलर पठडीच्या चित्रपटासाठी मानसीने अगदी कमी वयात अशा प्रकारची चरित्र भूमिका स्वीकारण्याचे धाडस दाखवले आहे. मराठी इंडस्ट्रीतील अनेक बहुश्रुत चेहऱ्यांनी नकार दिलेल्या या विशिष्ट भूमिकेला स्वीकारणाऱ्या मानसीचा हा पहिलाच हॉरर, थ्रिलर चित्रपट असेल. अमेरिकेहून परतलेल्या एका आईची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मानसीला एका आठवड्याचे स्पेशल ट्रेनिंगही घ्यावे लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत गाजलेल्या आयटम नंबर्समधून प्रेक्षकांच्या समोर आलेली मानसी या अमेरिकन आईच्या भूमिकेला कितपत न्याय देऊ शकेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.