'आनंद'च्या वाढदिवसानिमित्त मंगेशकर कुटुंबिय एकत्र !
By Admin | Updated: June 12, 2016 16:41 IST2016-06-12T16:41:27+5:302016-06-12T16:41:27+5:30
सुप्रसिद्ध गायक लता मंगेशकर यांनी आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांचा 11 जून रोजी वाढदिवस केला त्यावेळी त्यांच्या कुंटुबातील सर्वच सदस्य उपस्थित होते.

'आनंद'च्या वाढदिवसानिमित्त मंगेशकर कुटुंबिय एकत्र !
style="text-align: justify;">
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ : सुप्रसिद्ध गायक लता मंगेशकर यांनी आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांचा 11 जून रोजी वाढदिवस केला त्यावेळी त्यांच्या कुंटुबातील सर्वच सदस्य उपस्थित होते. आनंदचा हा आनंद त्यांनी आपल्या ट्विटरवर जाहीर केला. एकप्रकारे गेट टुगेदरचे फोटोच शेअर केले असे म्हणावे लागेल. आनंदच्या वाढदिवसाच्या निमित्तने घरगुती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं.
आनंद भोसले यांनी कुटुंबासोबत वाढदिवसाचा केक कापला या खास सेलिब्रेशनसाठी लता दीदींनी आनंद यांच्या खास आवडीचा पदार्थ बनवला होता, असं दीदींनी स्वतः सांगितलं आहे. यावेळी आशा भोसले यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते.
यादरम्यान त्यांनी आनंदच्या पहिल्या वाढदिवसाचा फोटोहा सोशल मिडियावर शेअर केला आहे. ब्लॅक अँन्ड व्हाईट असणाऱ्या या फोटोत सर्व मंगेशकर कुटुंबिय जमलेले दिसतात तोच योग काल पुन्हा आनंदच्या वाढदिवसानिमित्त आला असे म्हणावे लागेल.