मलाईकाचे अर्जुनसोबत डेटिंग
By Admin | Updated: July 14, 2014 05:33 IST2014-07-14T05:33:04+5:302014-07-14T05:33:04+5:30
बॉलीवूडची हॉट अभिनेत्री मलाईका अरोरा ही सध्या नवोदित अभिनेता अर्जुन कपूरसोबत डेटिंग करीत आहे.

मलाईकाचे अर्जुनसोबत डेटिंग
बॉलीवूडची हॉट अभिनेत्री मलाईका अरोरा ही सध्या नवोदित अभिनेता अर्जुन कपूरसोबत डेटिंग करीत आहे. सलमानचा धाकटा भाऊ अरबाज याची मलाईका ही पत्नी आहे. काही वर्षांपूर्वी अर्जुन आणि सलमानची बहीण अर्पिता यांच्यात चांगली मैत्री होती. अर्पिताशी बिनसल्यानंतर त्याने मलाईकाशी मैत्री केली. मलाईका आणि माझ्यात तसे काही नाही. काही विघ्नसंतोषी लोक उगाच अफवा पसरवत आहेत, असा खुलासा अर्जुनने केला आहे. अर्जुन हा निर्माता बोनी कपूरचा मुलगा असून, मलाईकापेक्षा तो १२ वर्षांनी लहान आहे. अर्जुनने जरी ‘डेटिंग’चे वृत्त फेटाळले असले, तरी बॉलीवूडमध्ये केव्हा काय घडेल, हे सांगणे कठीण असते.