मलायका बनली डान्स टीचर
By Admin | Updated: December 30, 2014 23:08 IST2014-12-30T23:08:51+5:302014-12-30T23:08:51+5:30
डॉली कि डोली’ या सोनम कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटासाठी डान्स क्वीन मलायका अरोरा-खानने एक स्पेशल डान्स नंबर केला आहे.

मलायका बनली डान्स टीचर
‘डॉली कि डोली’ या सोनम कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटासाठी डान्स क्वीन मलायका अरोरा-खानने एक स्पेशल डान्स नंबर केला आहे. या वेळी मलायकाचा डान्स पाहून अभिनेता राजकुमारचे डोळेच चक्रावले. इतक्या सुंदररीत्या मलायकाने केलेल्या डान्स स्टेप्स पाहून हरवून गेलेल्या राजकुमारलाही तिने काही स्टेप्स शिकवल्या. डान्स टीचर मलायकाचे अनुकरण करून त्याने डान्स पूर्ण केला.