‘बार्डो’मध्ये मकरंद देशपांडे दिसणार प्रमुख भूमिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2016 02:26 IST2016-02-11T02:26:51+5:302016-02-11T02:26:51+5:30
दगडी चाळ या चित्रपटात डॅडीची लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा चाहत्यांचा विशेष वर्ग निर्माण झाला आहे. आता डॅडी म्हणजेच, मकरंद देशपांडे हे ‘बार्डो’ नावाच्या

‘बार्डो’मध्ये मकरंद देशपांडे दिसणार प्रमुख भूमिकेत
दगडी चाळ या चित्रपटात डॅडीची लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा चाहत्यांचा विशेष वर्ग निर्माण झाला आहे. आता डॅडी म्हणजेच, मकरंद देशपांडे हे ‘बार्डो’ नावाच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. जीवनातील मूल्यांचा वेध घेणाऱ्या ‘बार्डो’ या सिनेमाचं दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केले आहे. हिंदी, तमीळ, तेलगू, मराठीमधील अनेक चित्रपट त्यांनी गाजवले आहेत. ‘बार्डो’ या चित्रपटामध्ये मकरंद देशपांडे यांच्या समवेत अशोक समथ, अंजली पाटील, गौतम जोगळेकर, गिरीश परदेशी, संदेश जाधव, प्रणव रावराने, श्वेता पेंडसे, सुयेश शिर्के, वर्षा दांडले, जगन्नाथ निवंगुणे, रमेश वाणी, पौर्णिमा आहेरे, अतुल महाजन, भूमि प्रधान, अगस्त्या मुडे प्रमुख भूमिका साकरणार आहेत. रितू फिल्म्स कट प्रॉडक्शन व पांचजन्य प्रॉडक्शन प्रा. लि. या सिनेमाची प्रस्तुती केली आहे. हिंदी, तमीळ, मराठी चित्रपटांमधून मकरंदने नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे आता ‘बार्डो’मधील मकरंद कोणती नवीन भूमिका साकारतो, याच्याकडे लक्ष लागले आहे.