लव्हबर्डस आहेत अजूनही एकत्रच..!

By Admin | Updated: April 28, 2017 00:51 IST2017-04-28T00:51:46+5:302017-04-28T00:51:46+5:30

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील प्रेमसंबंध कोणीच नाकारू शकत नाही. खरं तर आलियासाठी सिद्धार्थ हा परफेक्ट

Lovebirds are still together ..! | लव्हबर्डस आहेत अजूनही एकत्रच..!

लव्हबर्डस आहेत अजूनही एकत्रच..!

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यातील प्रेमसंबंध कोणीच नाकारू शकत नाही. खरं तर आलियासाठी सिद्धार्थ हा परफेक्ट बॉयफ्रेण्ड आहे. कारण जेव्हा जेव्हा हे दोघे स्पॉट झाले, तेव्हा तेव्हा सिद्धार्थ आलियाला प्रोटेक्ट करताना बघावयास मिळाला. नुकतेच या दोघांना निर्माता करण जोहर याच्या पार्टीत बघण्यात आले. जेव्हा हे दोघे पार्टीच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा करण आलियाला हेल्प करताना बघावयास मिळाला. शिवाय त्याने हेही दाखवून दिले की, तो आलियावर किती प्रेम करतो. या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आपल्या गर्लफ्रेण्डला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सिद्धार्थ तिची मदत करीत आहे. कारमधून उतरताना तो दरवाजा उघडण्यासाठी तिची मदत करीत आहे. तसेच एखाद्या जेंटलमॅनप्रमाणे अगोदर तिला कारमध्ये बसू देतो. नंतर तो ड्रायव्हिंग सीटवर बसतो. वास्तविक सिद्धार्थ अशी कृती पहिल्यांदाच करीत आहे, असे अजिबात नाही. तर तो जेव्हा संधी मिळेल तेव्हा परफेक्ट बॉयफ्रेण्डचे कर्तव्य पार पाडत असतो. अलीकडेच झालेल्या एका अ‍ॅवॉर्ड सोहळ्यातही सिद्धार्थ आलियाला प्रोटेक्ट करताना बघावयास मिळाला होता, त्यावरून जोरदार चर्चाही रंगली होती.

Web Title: Lovebirds are still together ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.