लिसाची इच्छापूर्ती
By Admin | Updated: August 30, 2014 04:30 IST2014-08-30T04:30:08+5:302014-08-30T04:30:08+5:30
‘क्वीन’ आणि ‘आयशा’सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये झळकणा-या लिसा हेडनला ज्या संधीची प्रतीक्षा होती,

लिसाची इच्छापूर्ती
‘क्वीन’ आणि ‘आयशा’सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये झळकणा-या लिसा हेडनला ज्या संधीची प्रतीक्षा होती, ती संधी तिला ‘शौकीन’ या चित्रपटाच्या रूपात मिळाली. हा चित्रपट हिट झाला, तर तिच्या बॉलीवूड करिअरसाठी नक्कीच ते फायद्याचे ठरणार आहे. एखाद्या बॉलीवूड स्टारसोबत काम करायला मिळावे, अशी लिसाची इच्छा होती. तिची ही इच्छा अक्षय कुमारने पूर्ण केली. ‘शौकीन’ या चित्रपटात लिसासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे लिसा खूपच खुश आहे. लिसा म्हणते की, ‘अक्षयसह चित्रपटात परेश रावल, अनुपम खेर, अन्नू कपूरसारखे उत्कृष्ट कलाकार आहेत. या सर्वांसोबत काम करून बरेच काही शिकायला मिळाले आहे.’ लिसाने शौकीनचे शूटिंग पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे तिने तिचे संवाद स्वत:च डब केले आहेत. ‘शौकीन’च्या रिलीजसाठी तिला नोव्हेंबर महिन्याची वाट पाहावी लागत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी लिसाला अपेक्षा आहे.