नायिका हवी निम्म्या वयाहून कमी!
By Admin | Updated: August 20, 2015 23:48 IST2015-08-20T23:48:41+5:302015-08-20T23:48:41+5:30
आपल्या वयाच्या निम्म्याहून कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्याची शाहरूखची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात आपल्या वयाच्या निम्म्याहून कमी

नायिका हवी निम्म्या वयाहून कमी!
आपल्या वयाच्या निम्म्याहून कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्याची शाहरूखची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात आपल्या वयाच्या निम्म्याहून कमी असलेल्या दीपिका पदुकोणसोबत शाहरूखने काम केले आहे. अशा प्रकारे काम करण्याचा बॉलीवूडमध्ये अभिनेत्यांचा इतिहास आहे. आधीच्या सिनेमात दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्यासमवेत चित्रपटात काम केले होते, त्या वेळी या दोघांच्या वयात दुपटीचा फरक होता. ‘दिवाना’ चित्रपटात ऋषी कपूरने दिव्या भारतीसोबत काम केले. त्या वेळी ऋषी कपूर यांचे वय ४२ तर दिव्याचे वय १८ होते. रजनीकांतसोबत ऐश्वर्या रॉय ‘रोबोट’मध्ये हीरोइन होती. ‘नि:शब्द’मध्ये जिया खान आणि ‘चीनी कम’ या चित्रपटात तब्बूसोबत अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. त्या वेळी त्यांच्या जोडीबाबत प्रश्न निर्माण करण्यात आले होते. अर्थात चित्रपटाच्या कथेला हे अनुरूप असल्याचे त्या वेळी सांगण्यात आले. बिग बीसाठी ही पहिलीच अशी वेळ नव्हती. सध्या जवळपास प्रत्येक अभिनेता आपल्या वयापेक्षा लहान असणाऱ्या अभिनेत्रींसोबत काम करण्याची इच्छा बाळगून आहे. खान त्रिकुटाचा विचार केल्यास केवळ शाहरूखच नव्हे तर सलमान खाननेदेखील ‘लकी’ चित्रपटात ऐश्वर्यासारख्या दिसणाऱ्या स्नेहा उलालसमवेत काम केले आहे. त्या वेळी स्नेहा केवळ १८ वर्षांची होती. ‘दबंग’ चित्रपटात २० वर्षांची सोनाक्षी सिन्हा, ‘वीर’ चित्रपटात २२ वर्षांच्या जरीन खानचा सलमान हीरो होता. आमीर खानसोबत ‘गजनी’ चित्रपटात १९ वर्षीय असीनने नायिकेची भूमिका केली होती. गतवर्षी आलेल्या ‘पीके’ चित्रपटात अनुष्कासमवेत आमीरची जोडी होती. या दोघांच्या वयात १८ वर्षांचे अंतर होते. अक्षय कुमारसमवेत ‘गब्बर’ चित्रपटात काम करणाऱ्या श्रुती हसनचे वय २७ होते. अक्षयसमवेत ‘स्पेशल छब्बीस’मध्ये काम करणाऱ्या काजल अग्रवालचे वय २७ होते. अजय देवगणने ‘हिम्मतवाला’ चित्रपटात २३ वर्षीय तमन्ना भाटिया समवेत काम केले होते. प्रत्येक काळानुरूप हे घडत आले आहे. यामुळेच शाहरूख खानला सर म्हणणारी आलिया भट्ट या संधीला आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे यश समजून सध्या हवेत उडत आहे.