आमिरकडून शिका पाहुण्यांना जा म्हणण्याची कला...

By Admin | Updated: November 2, 2016 02:23 IST2016-11-02T02:23:30+5:302016-11-02T02:23:30+5:30

आमिर खान त्याच्या सगळ्याच गोष्टीत परफेक्ट असतो.

Learn From Aamir The Art Of Going To Go ... | आमिरकडून शिका पाहुण्यांना जा म्हणण्याची कला...

आमिरकडून शिका पाहुण्यांना जा म्हणण्याची कला...


आमिर खान त्याच्या सगळ्याच गोष्टीत परफेक्ट असतो. नुकतेच त्याने त्याच्या घरात येणाऱ्या पाहुण्यांना कसा बाहेरचा रस्ता दाखवतो याबद्दल सांगितले. तो म्हणाला की, ‘आमच्या घरी लोक आल्यावर मला जेव्हा वाटते की, आता त्यांनी जावे तर मी त्यांना म्हणतो, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला! ही माझी पाहुण्यांना विनम्रपणे घरी जाण्यासाठी सांगण्याची पद्धत आहे. त्यामुळे जर कधी माझ्या घरी आला आणि मी तुम्हाला असे म्हणालो तर समजून जा की, निघण्याची वेळ झाली आहे.
आमिर त्याचे मामा नासिर हुसैन यांच्या जीवनचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होता. हे वाक्य मामाकडूनच शिकलो असल्याचे त्याने सांगितले. तो म्हणतो, ‘लहानपणी आम्ही नासिरसाहेबांच्या घरीच
असायचो. आम्ही सगळी लहान मुलं त्यांच्या घरी जमून एकत्रित जेवायचो. ते आमचे खूप लाड करायचे. पण जेव्हा त्यांची झोपायची वेळ व्हायची तेव्हा ते
म्हणायचे, ‘तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला.’ मग आम्हाला कळून जायचे की, आता जाण्याची वेळ झाली आहे. हीच सवय मग मलासुद्धा लागली.’ हे सांगून आमिरने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकवला.

Web Title: Learn From Aamir The Art Of Going To Go ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.