प्रियांकाच्या बहुचर्चित 'मेरी कोम' चित्रपटाचे पोस्टर लाँच
By Admin | Updated: July 15, 2014 13:29 IST2014-07-15T13:28:58+5:302014-07-15T13:29:07+5:30
प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित 'मेरी कोम' चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले असून सर्व स्तरांतून प्रियांकाच्या लूकचे कौतुक होत आहे.

प्रियांकाच्या बहुचर्चित 'मेरी कोम' चित्रपटाचे पोस्टर लाँच
>ऑनलाइन टीम
मुंबई,दि.१५ - प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित 'मेरी कोम' चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले असून सर्व स्तरांतून प्रियांकाच्या लूकचे कौतुक होत आहे. भारताची ऑलिम्पिक विजेती मुष्टियोद्धा मेरी कोम हिच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असून या चित्रपटासाठी प्रियांकाने कठोर मेहनत घेतली आहे. मेरी कोमला भेटून तिच्या जीवनाबद्दल तसेच अव्वल दर्जाची बॉक्सिंगपटू बनण्याच्या प्रवासात सामना कराव्या लागलेल्या अडचणींबद्दलही प्रियांकाने जाणून घेत आपल्या भूमिकेत जीव ओतण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटाच्या पोस्टरवर प्रियांकाचा बॉक्सिंग करतानाचा टफ लूक दिसत आहे. ओमंग कुमार याने चित्रपट दिग्दर्शित केला असून संजय लीला भन्साळी व व्हायाकॉम १८ हे निर्माते आहेत. ५ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.