सलमानसोबतचा 'ट्यूबलाईट' ठरला ओम पुरींचा शेवटचा सिनेमा
By Admin | Published: January 7, 2017 11:50 AM2017-01-07T11:50:55+5:302017-01-07T11:58:16+5:30
चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने प्रभावित करणारे ओम पुरी यांचा 'ट्यूबलाईट' हा शेवटचा चित्रपट ठरला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी ओम पुरी ओळखले जायचे. त्यांच्या अशा अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अर्धसत्य, मंडी, गांधी, स्पर्श, आक्रोश, भूमिका, घाशीराम कोतवाल अशा अनेक चित्रपट, नाटकांतील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. चित्रपटातून अनेकांना आपल्या अभिनयाने प्रभावित करणारे ओम पुरी यांचा 'ट्यूबलाईट' हा शेवटचा चित्रपट ठरला. चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी सेटवरचे फोटो ट्विटरवर शेअर केल्यानंतर ही माहिती मिळाली.
ओम पुरी यांच्या निधनाची बातमी मिळताच सेलिब्रेटिंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आठवणी शेअर करत श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. यामध्ये कबीर खानचादेखील समावेश होता. मात्र त्याने केलेल्या ट्विटमुळे चाहत्यांना त्या क्षणी एक दिलासा देणारा बातमी मिळाली. कारण फोटोमध्ये ओम पुरी ट्यूबलाईटच्या सेटवर दिसत होते.
Omji... u were laughing with us on set jst a few days ago! We have lost one of the greatest actor & the warmest person in the film industry— Kabir Khan (@kabirkhankk) 6 January 2017
Omji... I will miss that warm tight hug that you gave me every morning on set. Khudahafiz sir... you were the best!— Kabir Khan (@kabirkhankk) 6 January 2017
'तुम्ही काही दिवसांपूर्वी आमच्यासोबत सेटवर होतात. आज तुमच्या रुपात आम्ही एक महान कलाकार गमावलाय', असं ट्विट कबीर खानने केलं आहे.
ट्यूबलाईटच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा ओम पुरींना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. सलमान खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. 26 जून 2017 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
So sad . Lost one of the most iconic Actors, RIP Om Puri ji
Web Title: The last film of 'Om Puri', with Salman, was 'Liquidate'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.