फुलपाखरूसाठी ​विशाल-जगदीशची जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2017 17:13 IST2017-04-03T11:43:52+5:302017-04-03T17:13:52+5:30

विशाल-जगदीश यांच्या जोडीने आतापर्यंत अनेक मालिकेच्या शीर्षकगीतांना, चित्रपटांना संगीतच दिले नाही तर ही गीते त्यांनी लिहिलीदेखील आहेत. माझ्या नवऱ्याची ...

Larger for the butterfly - Jagadeesh's bundled pair | फुलपाखरूसाठी ​विशाल-जगदीशची जमली जोडी

फुलपाखरूसाठी ​विशाल-जगदीशची जमली जोडी

शाल-जगदीश यांच्या जोडीने आतापर्यंत अनेक मालिकेच्या शीर्षकगीतांना, चित्रपटांना संगीतच दिले नाही तर ही गीते त्यांनी लिहिलीदेखील आहेत. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे त्यांनी लिहिलेले आणि त्यांनी संगीत दिलेले शीर्षकगीत तर सध्या चांगलेच गाजत आहे. याशिवाय त्यांनी युथ या चित्रपटांच्या गीतांना संगीत दिले आहे तसेच स्लॅमबुकमधील दोन गीतांना संगीत दिले असून या चित्रपटातील सगळीच गाणी विशालने गायली आहेत. ही जोडी आता पुन्हा एकदा एका मालिकेचे शीर्षकगीत घेऊन येत आहे. 
फुलपाखरू ही मालिका लवकरच सुरू होणार असून या मालिकेचे शीर्षकगीत विशाल आणि जगदीश यांनी लिहिले असून त्याला संगीतदेखील दिले आहे आणि त्याचसोबत या मालिकेमध्येही काही गीते प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. या गीतांवर सध्या या दोघांचे काम सुरू आहे. याविषयी विशाल सांगतो, "पूर्वी केवळ मालिकांमध्ये शीर्षकगीत असायचे. पण आता मालिकेच्या भागांमध्येदेखील दृश्यानुरूप आपल्याला गीते पाहायला मिळतात. त्यामुळे एक गीतकार, संगीतकार म्हणून आम्हाला अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. फुलपाखरू या मालिकेत प्रेक्षकांना एक प्रेमकथा पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे या मालिकेचे शीर्षकगीत खूपच छान आहे. तसेच मालिकेत आणखी तीन गीतांचा समावेश असणार आहे. काही ठरावीक भागांनंतर मालिकेमध्ये गाणे असावे असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे. त्यामुळे ही मालिका म्हणजे रसिकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे."
विशाल-जगदीश सध्या या मालिकेसोबतच डोंबारी या चित्रपटावर काम करत आहे. गावराण बाजाचा हा चित्रपट असून या चित्रपटातील सगळी गाणी ते दोघेच लिहिणार असून त्यांना संगीतदेखील ते देणार आहेत. 





Web Title: Larger for the butterfly - Jagadeesh's bundled pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.