सलमान खानच्या आयुष्यात कतरिनाची पुन्हा एन्ट्री

By Admin | Updated: January 4, 2017 11:00 IST2017-01-04T09:19:02+5:302017-01-04T11:00:45+5:30

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफ पुन्हा एक आपल्या सलमान खानसोबत जवळीक साधत आहे.

Katrina's re-entry in Salman Khan's life | सलमान खानच्या आयुष्यात कतरिनाची पुन्हा एन्ट्री

सलमान खानच्या आयुष्यात कतरिनाची पुन्हा एन्ट्री

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफ पुन्हा एक आपल्या बॉलिवूडमधील गुरूसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमका कोण आहे हा बॉलिवूडमधील कतरिनाचा गुरू?. हा गुरू दुसरा तिसरा कुणी नसून कतरिनाचा एक्स बॉयफ्रेंड आणि हिंदी सिनेसृष्टीतील दबंग सलमान खान आहे. सलमान आणि कतरिनामधील वाढणारी जवळीक त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी खूशखबर आहे. 
 
कतरिनाने सलमानसोबत पुन्हा मैत्री करण्याचं कारण म्हणजे बॉलिवूडमधील तिच्या करिअर लागलेली उतरती कळा. 2016मधील 'फितूर' आणि 'बार बार देखों' हे बॉक्सऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. त्यामुळे इंडस्ट्रीत पुन्हा दमदार एन्ट्री करण्यासाठी कतरिनाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठीच ती गुरू सलमानसोबत जवळीक वाढवत असल्याची माहिती मिळते आहे. 
(सलमान ड्रग्ज माफिया तर आलिया कोकेन... अंडरवर्ल्डमधील सांकेतिक नावे उघड)
मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना कैफ आणि सलमान खान 'टायगर जिंदा है' सिनेमामध्ये एकत्र काम करण्यासाठी भेटणेदेखील सुरू केले आहे.  कतरिना योग्य सिनेमांची निवड करण्याबाबत सलमानची मदत घेत असल्याचीही माहिती आहे. नुकतेच सलमानने आगामी सिनेमा 'ट्यूबलाइट'चे शुटिंग पूर्ण केले. यावेळी सिनेमाच्या सेटवर कतरिनादेखील पोहोचली होती, यावेळी सिनेनिर्माता कबीर खान, सलमान खान आणि कतरिनाने मिळून पार्टीदेखील केली.  
(खिलाडी हिट है! सलमान-करणच्या सिनेमात अक्षय कुमार हिरो)
'एक था टायगर'चा सीक्वेल 'टायगर जिंदा है' शिवाय कतरिनाने अद्यापपर्यंत दुसरा कोणताही सिनेमा साइन केलेला नाही. कारण ती दमदार सिनेमांच्या प्रतीक्षेत असल्याचे म्हटले जात आहे.  कतरिनाने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती त्यावेळी सल्लूमियाँने तिला बरीच मदत केली होती. कतरिना कोणत्या सिनेमात काम करणार किंवा नाही करणार इथपर्यंतचा निर्णयदेखील सलमाननंच घेतला. 
(रईस, रंगूनसहीत 6 सिनेमांचे नवीन पोस्टर रिलीज)
यामुळे कतरिनाच भविष्यात मिसेस खान होणार असे सर्वांना वाटत होते. पण काही कारणास्तव या दोघांच्या नात्यात कटुता आली आणि दोघंही वेगळे झाले. मात्र, आता दोघांमध्ये पुन्हा मैत्री जुळून येत असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.   

Web Title: Katrina's re-entry in Salman Khan's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.