कतरिना नव्या घराच्या शोधात

By Admin | Updated: March 8, 2016 15:43 IST2016-03-08T15:43:09+5:302016-03-08T15:43:09+5:30

ब्रेक अप झाल्यानंतर रणबीरने थेट आपल्या आई-वडिलांचा 'क्रिष्णा राज' बंगला गाठला. कतरिना अजूनही रणबीर सोबत ज्या घरात रहात होती त्याच फ्लॅटमध्ये रहात आहे.

Katrina in search of a new house | कतरिना नव्या घराच्या शोधात

कतरिना नव्या घराच्या शोधात

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
 
मुंबई, दि. ८  - रणबीर कपूरशी ब्रेक अप झाल्यानंतर कतरिनाला 'त्या' नात्यातील सर्व प्रेमळ आठवणींपासून दूर जायचे आहे. ब्रेक अप झाल्यानंतर रणबीरने थेट आपल्या आई-वडिलांचा 'क्रिष्णा राज' बंगला गाठला. कतरिना अजूनही रणबीर सोबत ज्या घरात रहात होती त्याच फ्लॅटमध्ये रहात आहे. 
 
मात्र तिने आता नव्या घराचा शोध सुरु केला आहे. रणबीर आणि कतरिना कैफ प्रेमात असताना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. रणबीर आई-वडिलांच्या घरी न रहाता कतरिनासोबत रहात होता. बॉलिवुडलाईफ डॉट कॉमच्या वृत्तानुसार कतरिना सध्या बांद्रयामध्ये घर शोधत आहे. ती लवकरात लवकर नव्या घरात प्रवेश करणार आहे. 
 
व्यावसायिक दृष्टयाही कतरिनाचा सध्या वाईट काळ सुरु आहे. मागच्या महिन्यात प्रदर्शित झालेला 'फितूर' बॉक्सऑफीसवर विशेष कमाल दाखवू शकला नाही. नव्या घरात गेल्यानंतर 'अच्छे दिन' येतील अशी तिची अपेक्षा असावी. बांद्रयामध्ये रहायला गेल्यानंतर कतरिनाला सलमानचा शेजारही लाभेल. 

Web Title: Katrina in search of a new house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.