करिना कपूरला ६ कोटींची आॅफर?

By Admin | Updated: April 23, 2017 00:19 IST2017-04-23T00:19:16+5:302017-04-23T00:19:16+5:30

करिना कपूर सध्या तिच्या जुन्या फिगरमध्ये परतण्यासाठी मेहनत घेताना दिसतेय. रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करिना दिसणार असल्याचे म्हटले जातेय.

Kareena Kapoor gets 6 crores? | करिना कपूरला ६ कोटींची आॅफर?

करिना कपूरला ६ कोटींची आॅफर?

करिना कपूर सध्या तिच्या जुन्या फिगरमध्ये परतण्यासाठी मेहनत घेताना दिसतेय. रिया कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात करिना दिसणार असल्याचे म्हटले जातेय. पण, याबद्दल नाही तर आम्ही एक वेगळीच बातमी तुम्हाला देणार आहोत. होय, करिनाला म्हणे, एक महत्त्वपूर्ण भूमिका आॅफर झाली आहे. खास करिनाला समोर ठेवून ही भूमिका लिहिली गेली आहे आणि या चित्रपटासाठी करिनाला तब्बल ६ कोटी रुपयांचे मानधन मिळणार असल्याचीही खबर आहे.
अद्याप करिनाने हा चित्रपट साईन केला वा नाही, हे स्पष्ट झालेले नाही. पण आमच्या मते, इतकी तगडी भूमिका आणि इतके तगडे मानधन मिळत असताना हा प्रोजेक्ट नाकारण्याचे करिनाकडे काहीही कारण नाही.
एका मुलाची आई झाल्यानंतरही करिनाची लोकप्रियता कायम आहे, हेच यावरून स्पष्ट होते. करिना कपूर बॉलिवूडची एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिच्या अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. आता करिनाला तिच्या जुन्या ग्लॅमरस अंदाजात पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. चाहत्यांची ही प्रतीक्षा कधी संपणार ते लवकरच कळेल. आर. बल्की यांच्या ‘की अ‍ॅण्ड का’ सिनेमात करिना अखेरची दिसली होती.

Web Title: Kareena Kapoor gets 6 crores?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.