करिना-सैफनंतर सोहाच्या घरी हलणार पाळणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 07:51 IST2017-04-23T07:51:38+5:302017-04-23T07:51:38+5:30
सैफ अली खान आणि करीना कपूर खान तैमूरचे आई-बाबा बनल्यानंतर आता पतौडी कुटुंबाला नव्या पाहुण्याची चाहूल लागली आहे.

करिना-सैफनंतर सोहाच्या घरी हलणार पाळणा
tyle="text-align: justify;">ऑनलाइऩ लोकमत
मुंबई, दि. 23 - सैफ अली खान आणि करीना कपूर खान तैमूरचे आई-बाबा बनल्यानंतर आता पतौडी कुटुंबाला नव्या पाहुण्याची चाहूल लागली आहे. सैफची बहिण सोहा अली खान आई बनणार आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत कुणाल खेमूने या बातमीला दुजोरा दिला आहे.
पिंकविला डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत कुणाल खेमुने या वृत्ताला दुजारा दिला आहे. तो म्हणतो, हे खरे आहे की सोहा आई बनणार आहे. आम्हा दोघांना ही बातमी देतांना फार आनंद होत आहे की, याचवर्षी आमचे जॉईंट प्रॉडक्शन म्हणजेच आमचे पहिले बाळ येणार आहे. सर्वांच्या शुभेच्छांसाठी आम्ही धन्यवाद देतो.
मिळालेल्या माहितीनुसार सोहाची प्रसुती या डिसेंबरमध्ये होऊ शकते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये सोहाची वहिणी करिना कपूर खानने बाळाला जन्म दिला होता. सोहानेही आता बाळंतपणाचे धडे करिना कपूरकडून घ्यायला सुरुवात केली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये सोहा-कुणालने लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता. सोहा आणि कुणाल यांचा विवाह 25 जानेवारी, 2015 रोजी झाला होता.
सोहा-कुणाल यांनी तीन वर्षे डेट केल्यानंतर आणि नंतर लिव इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर 25 डिसेंबर 2015 ला लग्न केले होते.
"रंग दे बसंती", "साहब बीबी और गँगस्टर रिटर्न्स", "दिल मांगे मोअर" यांसारख्या चित्रपटात सोहाने अभिनय केला आहे. कुणाल खेमूने 2005 साली कलयुग चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ट्रॅफिक सिग्नल, ढोल, सुपरस्टार, ढुंढते रह जाओगे, गो गोवा गॉन यांसारखे चित्रपट केले. सध्या कुणाल गोलमाल अगेनचे शूटिंग करत आहे.