करण- रणबीरच्या चित्रपटात दिसणार सनीच्या अदा

By Admin | Updated: August 28, 2015 13:50 IST2015-08-28T13:47:20+5:302015-08-28T13:50:48+5:30

अॅडल्ट चित्रपटांकडून बॉलिवूडकडे वळलेल्या सनी लिऑनचे बॉलिवूडमध्ये बस्तान बसू लागले असून लवकरच ती रणबीर कपूरसोब करण जोहरच्या चित्रपटात दिसणार आहे.

Karan - Sunny's payday will be seen in Ranbir's movie | करण- रणबीरच्या चित्रपटात दिसणार सनीच्या अदा

करण- रणबीरच्या चित्रपटात दिसणार सनीच्या अदा

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - सुपरस्टार होण्याचे स्वप्न पहात अॅडल्ट चित्रपटांकडून बॉलिवूडकडे वळलेल्या सनी लिऑनची ही इच्छा आता खरच पूर्ण होताना दिसणार आहे. कारण  प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर अभिनेता रणबीर कपूरला घेऊन दिग्दर्शित करत असलेल्या 'ए दिल है मुश्किल' या मल्टिस्टारर चित्रपटात झळकायची संधी सनीला मिळाली आहे. या चित्रपटात रणबीरसह अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांचीही प्रमुख भूमिका असून सनी या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे. येत्या काही दिवसांतच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅडल्ट फिल्म्ससाठी प्रसिद्ध असलेल्या सनीला बॉलिवूडमध्ये येऊन बराच काळ लोटला आहे. तिला ए-लिस्ट बॅनर्स आणि हिरोजसोबत काम करण्याची इच्छा होती. अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या होम प्रॉडक्शनच्या 'सिंग इज ब्लिंग' चित्रपटात तिला रोल ऑफर केल्याने सनीची ही इच्छा पूर्ण झाली आहे. आणि आता अक्षय पाठोपाठ करण जोहरनेही तिला कास्ट केले असून ती चक्क रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. भारतीय प्रेक्षकांमध्ये असलेली सनीची क्रेझ लक्षात घेऊनच करणने तिला आपल्या चित्रपटात रोल ऑफर केला आहे. सनीनेही या मिळालेल्या या दोन्ही संधींचा फायदा करून घेत  हळूहळू मोठ्या स्टार्सच्या लीगमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

Web Title: Karan - Sunny's payday will be seen in Ranbir's movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.