कंगनाचं नाव ऐकताच करण जोहर म्हणाला...
By Admin | Updated: March 29, 2017 20:58 IST2017-03-29T20:46:39+5:302017-03-29T20:58:00+5:30
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर सध्या अभिनेत्री कंगना राणावतचं नाव ऐकलं तरी घाबरतो.

कंगनाचं नाव ऐकताच करण जोहर म्हणाला...
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर सध्या अभिनेत्री कंगना राणावतचं नाव ऐकलं तरी घाबरतो. जिथे कंगनाचं नाव ऐकायला येईल तेथून तो हल्ली पळ काढण्याचा विचार करतो. कंगनाचं नाव ऐकताक्षणी पळ काढण्याचं स्वतः करण म्हणाला आहे.
'कॉफी विथ करण'मध्ये 'रंगून'च्या प्रमोशनसाठी सैफ अली खानसोबत गेलेल्या कंगनाने बेधडक उत्तरं दिली होती. रॅपिड फायर राऊंडमध्ये तिने करण जोहरवर घराणेशाहीवरून निशाणा साधला होता. 'जेव्हा कधी तिच्या जीवनावर चित्रपट बनेल वा आत्मचरित्र लिहील, त्यावेळी त्यामध्ये घराणेशाहीच्या मुद्द्याला अनुसरुन काही भाग असेल आणि तो भाग करण जोहरनेच लिहिलेला असेल' असं ती म्हणाली होती.या वक्तव्याने करणही तेव्हा अवाक झाला होता. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरू आहे.
दरम्यान मंगळवारी एका कार्यक्रमात करण जोहर आला असता कंगना राणावतचं नाव निघाल्यावर त्याने निघून जाण्याचं वक्तव्य केलं. या कार्यक्रमात एका एंकरने मी द्वेषाच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही मला वाटतं प्रेमात जास्त ताकद आहे असं वक्तव्य केलं. त्यावर तुम्ही कोण आहात असा प्रश्न करणने एंकरला केला. प्रत्युत्तरात मी कंगना आहे असं एंकर म्हणाला आणि सर्वत्र शांतता पसरली. पण थोड्याचवेळात, खरंच जर असं असेल तर मला आता येथून पळून जायला पाहिजे असं करण म्हणाला.