द कपिल शर्मा शो होणार बंद?

By Admin | Updated: March 26, 2017 09:22 IST2017-03-26T08:06:09+5:302017-03-26T09:22:52+5:30

सोनी टीव्हीवरील लोकप्रिय 'द कपिल शर्मा शो'वर सध्या संकटाचं वादळ

The Kapil Sharma show going off? | द कपिल शर्मा शो होणार बंद?

द कपिल शर्मा शो होणार बंद?

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - सोनी टीव्हीवरील लोकप्रिय 'द कपिल शर्मा शो'वर सध्या संकटाचं वादळ घोंगावत आहे.  काही दिवसांपासून कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर यांच्यातील वाद वाढतच आहे. दोघांच्या मैत्रीत आलेल्या दुराव्याचा फटका बसून शो बंद पडण्याची शक्यता आहे.  दोघांमधील वाढत्या वादामुळे सोनी चॅनल हा शो बंद करण्याचा विचार करत असल्याचं वृत्त आहे. 
 
पुढील महिन्यात या शोचा सोनीसोबत करार संपणार आहे. त्यामुळे करार न वाढवण्याचा सोनी चॅनल विचार करत असल्याची माहिती आहे.  याबाबत चॅनलकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण जर हा कारार न वाढवल्यास प्रेक्षकांचा आवडीचा हा शो बंद पडू शकतो. 
 
काही मोठ्या सेलिब्रीटींनी शोमध्ये येण्यास नकार दिला आहे, त्यामुळे शूटिंग रद्द करण्याची नामुष्की कपिलवर आली असं वृ्त डीएनएने दिलं आहे. त्यामुळे आपला आगामी सिनेमा 'फिरंगी'च्या शूटिंगसाठी कपिल बिकानेरला रवाना झाला असून 29 मार्चला मुंबईत परतणार असल्याचं या वृ्त्तात म्हटलं आहे. 
 
तर इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार शो बंद होणार नाही, चॅनलने करार वाढवण्यास नकार दिलेला नाही. दरम्यान, कपिल शर्माने ऑस्ट्रेलियाहून येत असताना सुनिल ग्रोव्हरला विमानात मारहाण केल्याचं वृत्त आल्यानंतर मोठा वाद सुरू झाला.  कपिल शर्मा आपल्या संपूर्ण टीमसह ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नमध्ये शोसाठी गेला होता. हा शो संपवून हे सर्वजण ऑस्ट्रेलिया ते मुंबई असा इकॉनॉमी क्लासने प्रवास करत होते. यावेळी कपिलनं दारुच्या नशेत सुनिल ग्रोवरला मारहाण केली. या मारहाणीवेळी कपिल शर्माने सुनिल ग्रोवरसाठी अपमानास्पद भाषेचाही वापर केल्याचं स्पॉटबॉयने म्हटलं आहे.   
 
 
 

Web Title: The Kapil Sharma show going off?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.