सुनील ग्रोव्हरची जागा घेणार कपिलचा प्रतिस्पर्धी
By Admin | Updated: March 23, 2017 19:14 IST2017-03-23T18:05:39+5:302017-03-23T19:14:14+5:30
कपिल सोबत झालेल्या वादानंतर नाराज सुनील ग्रोव्हर ने द कपिल शर्मा शो सोडल्याचे वृत्त ताजे असतानाच आता नवीन वृत्त समोर आले आहे.

सुनील ग्रोव्हरची जागा घेणार कपिलचा प्रतिस्पर्धी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - कपिल सोबत झालेल्या वादानंतर नाराज सुनील ग्रोव्हरने द कपिल शर्मा शो सोडल्याचे वृत्त ताजे असतानाच आता नवीन वृत्त समोर आले आहे. एका बसाईटच्या वृत्तानुसार, सुनीलच्या जागी कपिल शर्माचा प्रतिस्पर्धी कृष्णा अभिषेकची वर्णी लागली आहे. शोच्या सेटवर अगदी सख्ख्या मित्राप्रमाणे वावरणाऱ्या कपिल-सुनील या दोन्ही कलाकारांमध्ये आता शत्रूत्त्व निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

डीएनएला कृष्णाने दिलेल्या मुलाखतीत, त्याला सुनील ग्रोव्हर शो सोडण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न विचारला असता त्याने, काही हरकत नाही बहुधा कपिल आणि मी एकत्र काम करु, असे उत्तर दिले. कृष्णाचे हे वक्तव्यवरुन सुनीलच्या जागी त्याची वर्णी लागणार असल्याची ही पूर्वकल्पना तर नाही ना असेच म्हणावे लागेल.
गेल्या आठवड्यात विमानामध्ये कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरला केलेली माराहण आणि शिवीगाळ यासंबंधी सतत चर्चा केली जात आहे. वाद इतका चिघळला आहे की सुनील ग्रोव्हरने कपिलची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुनिल सोबत अली असगर आणि चंदन प्रभाकरही शो सोडणार असल्याची माहिती आहे. तर इतर अन्य एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, इतर सुनीलच्या जागी विनोदवीर राजू श्रीवास्तवाची वर्णी लागण्याची शक्यता आहे.