ह्रितिकच्या कायदेशीर नोटीसला कंगनाचे उत्तर
By Admin | Updated: March 18, 2016 09:09 IST2016-03-18T09:09:48+5:302016-03-18T09:09:48+5:30
ह्रितिक आणि कंगनाच्या शाब्दीक लढाईमुळे त्यांच्या नात्यातील वेगवेगळे पदर उलगडत चालले आहेत.

ह्रितिकच्या कायदेशीर नोटीसला कंगनाचे उत्तर
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - ह्रितिक रोशन आणि कंगना राणावतमध्ये सुरु झालेली कायदेशीर लढाई अधिकाधिक तीव्र होत चालली आहे. दोन्ही बाजूंकडून सुरु असलेल्या शाब्दीक लढाईमुळे ह्रितिक-कंगनाच्या नात्यातील वेगवेगळे पदर उलगडत चालले आहेत.
ह्रितिककडून स्टेटमेंट आल्यानंतर कंगनाच्या टीमनेही त्याला उत्तर दिले आहे. ह्रितिकने प्रसारमाध्यमांमध्ये जी विधाने केली आहेत ती फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी आहेत. कायदेशीररित्या माझ्या अशीलाला धमकावल्यानंतर ह्रितिक आता या वादातून अंग काढून घेऊ शकत नाही. माझ्या अशिलाने कुठेही ह्रितिकचे नाव घेतले नव्हते. त्याने स्वत:हूनच नोटीसमध्ये सिली एक्स असल्याचा दावा केला आहे.
उलट ह्रितिकच्याच कृतीमुळे प्रसारमाध्यमांना चर्चेला विषय मिळाला आहे. तो या सर्वासाठी माझ्या अशिलाला कसा जबाबदार धरु शकतो असे कंगनाच्या वतीन पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
अलीकडे एका कार्यक्रमात कंगना राणावतला आशिक ३ मधून ह्रितिकच्या सांगण्यावरुन तुला बाहेर काढण्यात आले असा प्रश्न विचारला. त्यावर तिने ह्रितिक 'सिली एक्स' म्हटले. त्यावरुन माध्यमांमध्ये या दोघांच्या प्रेमसंबंधांची चर्चा सुरु झाली आणि हा सर्व वाद सुरु झाला. ह्रितिकने लगेच टि्वटरवरुन कंगनाला तिखट शब्दात उत्तर दिले व प्रतिमा खराब करण्यासाठी मानहानीची नोटीस पाठवली.