कंगना ‘आई’ म्हणून जबाबदारी घेण्यास उत्सुक
By Admin | Updated: September 3, 2015 22:25 IST2015-09-03T22:25:59+5:302015-09-03T22:25:59+5:30
‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ गर्ल कंगना राणावतने तिचा आगामी चित्रपट ‘कट्टी बट्टी’च्या प्रमोशनमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप, लग्नाविषयी विचार व्यक्त केले आहेत.

कंगना ‘आई’ म्हणून जबाबदारी घेण्यास उत्सुक
‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ गर्ल कंगना राणावतने तिचा आगामी चित्रपट ‘कट्टी बट्टी’च्या प्रमोशनमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप, लग्नाविषयी विचार व्यक्त केले आहेत. आता ती आईपणाविषयीचे तिचे विचार मांडत आहे. तिला मूल दत्तक घ्यायला आवडेल का, असे विचारले असता ती म्हणाली, ‘मला डायपर चेंज करायला आवडणार नाही. पण खरंच खूप कठीण काम आहे ते. मात्र, ती जबाबदारी घ्यायला आवडेल.’