स्टंटसाठी मिला जोवोव्हिचने का सोसल्या नरक यातना?

By Admin | Published: January 29, 2017 02:14 AM2017-01-29T02:14:05+5:302017-01-29T02:14:05+5:30

पुरुष सुपरहिरो आणि अ‍ॅक्शन हीरो तुम्ही खूप सारे पाहिले असतील. अ‍ॅक्शन सिनेमांत तर अभिनेत्यांचीच चलती असते. परंतु याला अपवाद म्हणजे हॉलीवूड अभिनेत्री मिला जोवाव्हिचचा.

Jovovichane's death hell torture for a stunt? | स्टंटसाठी मिला जोवोव्हिचने का सोसल्या नरक यातना?

स्टंटसाठी मिला जोवोव्हिचने का सोसल्या नरक यातना?

googlenewsNext

पुरुष सुपरहिरो आणि अ‍ॅक्शन हीरो तुम्ही खूप सारे पाहिले असतील. अ‍ॅक्शन सिनेमांत तर अभिनेत्यांचीच चलती असते. परंतु याला अपवाद म्हणजे हॉलीवूड अभिनेत्री मिला जोवाव्हिचचा. ‘रेसिडेंट ईव्हिल: द फायनल चाप्टर’ या आगामी चित्रपटातील सर्व स्टंट मिलाने स्वत: केले असून त्यासाठी तिने खूप नरक यातना सोसल्या आहेत. ती सांगते, ‘खरं सांगू तर चित्रपटाचा दिग्दर्शक पॉल अँडरसनने मला खूप त्रास दिला आहे. इतके अवघड आणि कठीण स्टंट व अ‍ॅक्शन सीन्स त्याने माझ्याकडून करून घेतले. पटकथेनुसार आम्हाला अत्यंत खडतर परिस्थिती शूटिंग करायची होती. कधी खराब तलावात तर कधी
कॅ नडाच्या कडाक्याची थंडीत उणे २० डिग्री तापमानात पहाटे २ वाजता बाहेर तर कधी नोव्हेंबर महिन्यात पावसात आम्ही शूटींग केली.’ ‘रेसिडेंट एव्हिल’ या चित्रपट सिरीजमधील हा सहावा आणि शेवटचा भाग आहे. येत्या ३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Web Title: Jovovichane's death hell torture for a stunt?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.