जॉन लेननच्या केसांची किंमत 24 लाख रुपये
By Admin | Updated: February 22, 2016 23:23 IST2016-02-22T18:14:23+5:302016-02-22T23:23:42+5:30
प्रसिद्ध गायक जॉन लेननच्या केसांचा गुच्छा तब्बल 35 हजार डॉलर म्हणजेच 24 लाख रुपयांना विकला गेला आहे

जॉन लेननच्या केसांची किंमत 24 लाख रुपये
>ऑनलाइन लोमकत -
डलास (टेक्सास). दि. 22 - प्रसिद्ध गायक जॉन लेननच्या केसांचा गुच्छा तब्बल 35 हजार डॉलर म्हणजेच 24 लाख रुपयांना विकला गेला आहे. अमेरिकेत झालेल्या एका लिलावत हा 10सेमी केसांचा गुच्छा ठेवण्यात लिलावासाठी ठेवण्यात होता. पॉल फ्रेजर यांनी हा केसांचा गुच्छा विकत घेतला आहे.
'हाऊ आय विन द वॉर' चित्रपटासाठी जॉन लेननला आपले केस कमी करायचे होते. ज्या हेअर ड्रेसरवर ही जबाबदारी देण्यात आली होती त्याने केस कापून झाल्यावर तो केसांचा गुच्छा आपल्याकडेच सुरक्षित ठेवला होता. टेक्सासमध्ये जॉन लेनन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत. जॉन लेनन यांच्या 1965 रॉल्स रॉयस फँटम फाईव्हची २२ लाख ३० हजार डॉलरमध्ये विक्री झाली होती.
1980 साली जॉन लेनन यांची न्यूयॉर्कमधील त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.