जान्हवी कपूरने केली कॉस्मेटिक सर्जरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 05:45 IST2017-07-05T05:45:20+5:302017-07-05T05:45:59+5:30
श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर एक पॉप्युलर स्टार किड आहे, यात कुठलेही दुमत नाही. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वीच जान्हवी स्टार झाली

जान्हवी कपूरने केली कॉस्मेटिक सर्जरी?
श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर एक पॉप्युलर स्टार किड आहे, यात कुठलेही दुमत नाही. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वीच जान्हवी स्टार झाली आहे. जान्हवीला साधी शिंक आली, तरी ती सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागते. मित्रासोबतचे आऊटिंग असो, मम्मासोबतचा ग्लॅमरस लुक असो किंवा बॉलिवूडची पार्टी असो, जान्हवी जिथे दिसेल, जिथे जाईल त्याची अलीकडे बातमी व्हायला लागली आहे. बऱ्याच दिवसांपासून जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा सुरू आहे. पण, त्याशिवायही एका कारणामुळे जान्हवी सध्या चर्चेत आहे. होय, ते कारण म्हणजे नाकाची सर्जरी. जान्हवीने नाकाची सर्जरी केली, अशी खबर आहे.
ताज्या फोटोत जान्हवीचे नाक बरेच स्लीम दिसतेय. अर्थात, जान्हवीने खरोखरीच नोज सर्जरी केली वा नाही, याबाबत आम्ही दाव्यानिशी सांगू शकत नाही. पण तिचे आधीचे आणि आत्ताचे फोटो बघता या बातमीवर विश्वास ठेवणे फार कठीण वाटत नाही. अलीकडे जान्हवी कपूर आणि शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर हे दोघेही शेनली वुडलीच्या ‘फॉल्ट इन अवर स्टार’ या हॉलिवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये एकत्र दिसू शकतात, अशी बातमी होती.