स्त्रीशक्तीच्या विचारांचा जागर

By Admin | Updated: September 12, 2016 02:46 IST2016-09-12T02:46:48+5:302016-09-12T02:46:48+5:30

महिला शक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’ नेहमीच आघाडीवर राहिला आहे. ‘लोकमत’च्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘ती’ चा गणपती हा असाच एक अभिनव उपक्रम आहे.

Jagar of feminine thoughts | स्त्रीशक्तीच्या विचारांचा जागर

स्त्रीशक्तीच्या विचारांचा जागर

महिला शक्तीचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’ नेहमीच आघाडीवर राहिला आहे. ‘लोकमत’च्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘ती’ चा गणपती हा असाच एक अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमाला चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री भेट देत आहेत. ‘लोकमत’च्या पुरोगामित्वाच्या भूमिकेला या माध्यमातून त्यांनी बळच दिले आहे.

विजय दर्डा (चेअरमन लोकमत मीडिया प्रा.लि.): लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सावाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. आज महिलांचेदेखील असंख्य प्रश्न आहेत. महिलांचा मान, सन्मान असो किंवा हुंड्याचा प्रश्न असो. यासाठी लोकमतने नेहमीच पाऊल उचलले आहे. लोकमतच्या प्रयत्नानंतर शनिशिंगणापूरचा चौथरा महिलांसाठी खुला झाला. हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. लोकमतने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत जनजागृतीचे काम केले आहे. रितेश ‘ती चा गणपती’ला आला याचा मनापासून आनंद आहे. त्याच्या कुटुंबियांचे राज्यात मोठे योगदान आहे.


रितेश देशमुख: लोकांचे मत लोकांपर्यत पोहोचविण्याचे लोकमत करीत आहे. लोकमत दिशा दाखवितो. समाजात अशा काही गोष्टी आहेत, त्याची दखल घेतली जात नाही. पण लोकमतच्या ‘ती चा गणपती’ या उपक्रमातून या गोष्टींची दखल घेण्यात आली आहे. ‘ती चा गणपती’ म्हणजे ती शक्ती आणि स्त्रीशक्ती. याशिवाय जग हे पुढेच जाऊच शकत नाही. देश घडविण्यात स्त्रीचा वाटा मोठा व अनमोल आहे. ‘ती चा गणपती’ची स्थापना संपूर्ण देशात नव्हे तर जगात पहिल्यांदा होत आहे. ही संकल्पना देशातील प्रत्येक शहरामध्ये रूजायला हवी.

रवी जाधव: ‘ती चा गणपती’ ही संकल्पना इतकी सुंदर आहे सुचायला वेळ का लागला? प्रत्येक श्लोक, मंत्र आणि आरतीमध्ये त्याला त्याच्या आईने कसे घडविले हे सांगितले जाते. गणपती ‘ती चा’च आहे. हे करावे वाटते याचा खेद वाटतो. पण हे प्रचंड मोठया प्रमाणात वाढो ही सदिच्छा.

क्रिशिका लुल्ला: लोकमतच्या ‘ती चा गणपती’ला आल्याचा मला अभिमान वाटतो आहे. महिलांचा अशा पद्धतीने सन्मान होत आहे हे पाहून देखील आनंद झाला आहे. ‘ती चा गणपती’ असाच उत्तरोत्तर मोठा व्होवो हीच सदिच्छा

स्मिता तांबे : ‘लोकमत’ने महिलांना आरतीचा मान दिला आहे त्यासाठी खरच मनापासून मी त्यांचे आभार व्यक्त करते. ‘तीचा गणपती’मुळे देखील आता बऱ्याच मंडळांमध्ये महिलांच्या हस्ते आरती होऊ लागेल. तेव्हा खरे परिवर्तन घडेल. ‘लोकमतच्या तीचा गणपती’ला माझ्या मनापासून शुभेच्छा.


अलका कुबल-आठल्ये : पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर, ललिता बाबर यांनी रिओ आॅलिंपिकमध्ये खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा जागर केला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. लोकमतच्या ‘ती चा गणपती’ या उपक्रमामुळे महिलांना समाजात वेगळी प्रतिष्ठा मिळत आहे. आज खऱ्या अर्थाने स्त्रीचा सन्मान होत आहे.

भार्गवी चिरमुले : स्त्रीला देवी किवा अन्य कोणत्याही रूपात पाहण्यापेक्षा सर्वप्रथम तिला माणूस म्हणून दर्जा देणे आवश्यक आहे. प्रत्येक स्त्रीला आदर, सन्मान दिला पाहिजे. आज हे काम ‘लोकमतने ती चा गणपती’ या उपक्रमाच्या माध्यमातून करून दाखविले आहे.

सोनाली कुळकर्णी : प्रत्येक तरुणींच्या घरी ‘ती चा गणपती’ स्थापन झाला पाहिजे. कोणताही सण समारंभ तिच्याशिवाय अपूर्ण आहे. रिओ आॅलिंपिकमध्ये भारतीय कन्यांनी चमकदार कामगिरी करत भारताची मान उंचावली आहे. ‘लोकमत’ने ही सजावटीसाठी रिओची थीम वापरून स्त्री शक्तीला सलाम केला आहे. ‘तीचा गणपती’ला मागील 3 वर्षांपासून भेट देत असल्यामुळे हा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे.

Web Title: Jagar of feminine thoughts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.