जॅकलीनने ‘किक’साठी वाढवले वजन
By Admin | Updated: July 15, 2014 13:48 IST2014-07-15T13:48:06+5:302014-07-15T13:48:06+5:30
श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिससाठी किक हा चित्रपट खूप चांगली संधी आहे. त्यामुळेच या चित्रपटासाठी वाट्टेल ते करायला जॅकलीन तयार झाली.

जॅकलीनने ‘किक’साठी वाढवले वजन
श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिससाठी किक हा चित्रपट खूप चांगली संधी आहे. त्यामुळेच या चित्रपटासाठी वाट्टेल ते करायला जॅकलीन तयार झाली. झीरो फिगरचा त्याग करून तिने या चित्रपटासाठी वजन वाढवले आहे. या चित्रपटात जॅकलीन एका महाविद्यालयीन तरुणीच्या भूमिकेत आहे. ती म्हणाली की, ‘रेस-२’मध्ये अॅक्शन सीन्स असल्याने मला बरेच वजन कमी करावे लागले होते. किकसाठी मात्र ते वाढवावे लागले. आता माझे वजन ५६ कि.ग्रॅ आहे. मी खुश आहे.’ २५ जुलै रोजी रिलीज होणाऱ्या किक या चित्रपटात जॅकलीनसोबत सलमान खान मुख्य भूमिकेत आहे.