​‘मोहिनी’ बनून आली जॅकलिन फर्नांडिस! पाहा, ‘बागी2’चे नवे गाणे ‘एक दो तीन’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 12:21 IST2018-03-19T06:51:53+5:302018-03-19T12:21:53+5:30

टायगर श्रॉफचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘बागी2’ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि आत्तापर्यंत रिलीज झालेल्या ‘ओ साथी’,‘लो सफर’ आणि ‘मुंडेया’ या तिन्ही गाण्यांनी धूम केलीयं. आता या चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे आयकॉनिक रिक्रिएटेड गाणे रिलीज झाले आहे .

Jacqueline Fernandes becomes 'Mohini'! Look, the new song of 'Baghi2' is 'One Two Three' !! | ​‘मोहिनी’ बनून आली जॅकलिन फर्नांडिस! पाहा, ‘बागी2’चे नवे गाणे ‘एक दो तीन’!!

​‘मोहिनी’ बनून आली जॅकलिन फर्नांडिस! पाहा, ‘बागी2’चे नवे गाणे ‘एक दो तीन’!!

यगर श्रॉफचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘बागी2’ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि आत्तापर्यंत रिलीज झालेल्या ‘ओ साथी’,‘लो सफर’ आणि ‘मुंडेया’ या तिन्ही गाण्यांनी धूम केलीयं. आता या चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे आयकॉनिक रिक्रिएटेड गाणे रिलीज झाले आहे आणि या गाण्यानेही इंटरनेटवर धूमाकुळ घातला आहे. 



हे गाणे १९८८ मध्ये आलेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातील ‘एक दो तीन’ या गाण्याचे रिक्रिएटेड व्हर्जन आहे. ‘तेजाब’च्या या आयकॉनिक गाण्यावर माधुरी दीक्षितला थिरकतांना आपण पाहिलेय.  याच गाण्याच्या ‘बागी2’च्या नव्या व्हर्जनमध्ये मात्र माधुरीऐवजी जॅकलिन फर्नांडिस थिरकताना दिसतेय. अहमद खान आणि गणेश आचार्य यांनी हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. गाण्यातील जॅकलिनच्या अदा वेड लावणाºया आहेत. तिचा   डान्स बघता, तिने या गाण्यासाठी घेतलेली मेहनत स्पष्ट दिसते. अर्थात माधुरीला कॉपी करणे कठीण आहे. पण ज्याप्रमाणे माधुरीने प्रेक्षकांना जिंकले होते, जॅकलिननेही अगदी तशीच आग लावली आहे. श्रेया घोषाल हिच्या आवाजातील हे गाणे संदीप शिरोडकरने रिक्रिऐट केले आहे. हे गाणे तुम्हीही बघा आणि जॅकचा अंदाज तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला नक्की कळवा.

ALSO READ : ‘बागी2’मधील टायगर श्रॉफच्या बदलेल्या लूकमागे आहे पाच आठवड्यांची कहाणी!

‘बागी2’बद्दल सांगायचे झाल्यास, यात टायगरचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तो त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अहमद खान दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ३० मार्चला रिलीज होतोय. हा चित्रपट गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा  सीक्वल आहे. ‘बागी’मध्येही टायगर हाच लीड रोलमध्ये होता. त्याच्या अपोझिट श्रद्धा कपूर दिसली होती. पण ‘बागी2’मध्ये मात्र श्रद्धा ऐवजी टायगरची गर्लफ्रेन्ड दिशा पटनी हिची वर्णी लागलीयं. प्रतीक बब्बर हा सुद्धा या चित्रपटात एका निगेटीव्ह भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी ‘बेफिकरा’ या गाण्यात  टायगर व दिशाची  हॉट केमिस्ट्री दिसली होती. आता ‘बागी2’मध्ये पुन्हा या लव्हबर्ड्सची हॉट केमिस्ट्री रंगणार आहे. ‘बागी2’शिवाय टायगर ‘रॅम्बो’या हॉलिवूडपटाच्या आॅफिशिअल रिमेकमध्येही बिझी आहे.

Web Title: Jacqueline Fernandes becomes 'Mohini'! Look, the new song of 'Baghi2' is 'One Two Three' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.