#JabHarryMetSejal : "इंटरकोर्स" शब्दावरून पहलाज निहलानींची पलटी ?
By Admin | Updated: July 1, 2017 12:29 IST2017-07-01T12:29:31+5:302017-07-01T12:29:31+5:30
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी सिनेमा "जब हॅरी मेट सेजल" रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे.

#JabHarryMetSejal : "इंटरकोर्स" शब्दावरून पहलाज निहलानींची पलटी ?
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी सिनेमा "जब हॅरी मेट सेजल" रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. सिनेमाच्या ट्रेलर व्हिडीओमध्ये "इंटरकोर्स" शब्दाचा वापर करण्यात आल्यानं सेंसर बोर्डानं त्यावर आक्षेप नोंदवला होता. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाच्या रिलीज करण्यात आलेल्या एका ट्रेलरमध्ये "इंटरकोर्स"या शब्दावर सेंसर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आक्षेप नोंदवला होता. मात्र, निहलानी यांच्या आक्षेपावर लोकांनी टीका करण्यात सुरुवात केल्यानंतर, जर सर्वसामान्य जनतेनं या शब्दाचं समर्थन करत एक लाखांपर्यंत मतं नोंदवली तर या सिनेमात वापरण्यात आलेल्या "इंटरकोर्स" या शब्दाबाबत तेदेखील सहमत असतील, असं निहलानी म्हणाले होते. पण आता त्यांच्याच या वक्तव्यावर निहलांनी यांनी पलटी मारली, अशी चर्चा सुरू झाली आहे.
23 जून रोजी मिरर नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना निहलांनी यांनी मतांबद्दल सांगितलं होतं. त्यानुसार मिरर नाऊने या मुद्द्यावर प्रेक्षकांचा पोल घेतला होता. त्या पोलला एकुण 1 लाख 20 हजार मतं मिळाली. त्यानंतर जेव्हा पहलाज निहलानी यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी या मुद्द्यावर कोणतंही वक्तव्य केलं नाही. मिरर नाऊच्या प्रतिनिधीने विचारलेल्या एकाही
प्रश्नाचं पहलाज निहलानी यांनी उत्तर दिलं नाही. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी जब हॅरी मेट सेजल या सिनेमाला "ए" सर्टिफिकेट न देता सिनेमातील "इंटरकोर्स" या शब्दाला मान्यता देण्यास नकार दिला होता. जी लोक सहपरिवार हा सिनेमा पाहतील अशांसाठी तसंच लहान मुलांसाठी हा शब्द योग्य नाही, असं म्हणत निहलानी यांनी या शब्दावर आक्षेप घेतला होता.
आणखी वाचा :
#JabHarryMetSejal : "इंटरकोर्स" शब्दावरील सेंसर बोर्डाच्या आक्षेपावर SRKचं स्पष्टीकरण
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या या वक्तव्यावर अभिनेता शाहरूख खाननेही मिश्किल उत्तर दिलं होतं, मला असं वाटतं की माझं वय 18 वर्षांहून कमी आहे, त्यामुळे मी माझं मत नोंदवू शकत नाही. पुढे तो असंही म्हणाला की, मी आणि सिनेमातील कोणताही सदस्य, इम्तियाज, गीतकार इर्शाद कामिल, प्रितम कोणत्याही प्रकारे अनुचित शब्दाचा वापर करणार नाही, जेणेकरुन एखाद्या परिवाराच्या किंवा कुणाच्याही भावना दुखावल्या जातील.
अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान यांची मुख्य भूमिका असलेला "जब हॅरी मेट सेजल" सिनेमा 4ऑगस्ट रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.