‘नॉनसेन्स की नाईट’ हिट ठरणार
By Admin | Updated: October 13, 2014 03:14 IST2014-10-13T03:14:56+5:302014-10-13T03:14:56+5:30
फराह खान हिने पहिल्यांदा गाणे लिहिले. मिका सिंह यानेदेखील पहिल्यांदाच इंग्रजी गाणे गायले. परिणामी, ‘नॉनसेन्स की नाईट’ या गाण्याचा जन्म झाला

‘नॉनसेन्स की नाईट’ हिट ठरणार
फराह खान हिने पहिल्यांदा गाणे लिहिले. मिका सिंह यानेदेखील पहिल्यांदाच इंग्रजी गाणे गायले. परिणामी, ‘नॉनसेन्स की नाईट’ या गाण्याचा जन्म झाला. ‘हॅप्पी न्यू ईअर’ या चित्रपटातील हे संपूर्ण गाणे इंग्रजी आहे. पहिल्या वेळी जेव्हा तुम्ही हे गाणे ऐकताल तेव्हा ते कदाचित तुम्हाला समजणारदेखील नाही. त्यामुळेच निर्मात्याने गाण्यासोबत त्याचा हिंदीतील अर्थही स्क्रीनवर दिला आहे. या गाण्याबद्दलच्या आठवणी फराहने टिष्ट्वटरवरून शेअर केल्या आहेत. ‘ढिंका चिका’सारखे गाणे पसंत करणाऱ्या युवा पिढीला आणि बच्चे कंपनीला हे गाणे निश्चित आवडेल, असा विश्वास फराहने व्यक्त केला आहे. माझे गुरू मायकल जॅक्सनला श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आल्याचेही फरहाने सांगितले.