विद्याला आवडत नाहीत आयटम साँग
By Admin | Updated: June 16, 2014 11:48 IST2014-06-16T11:37:49+5:302014-06-16T11:48:10+5:30
विद्या बालनला आयटम साँग करण्यात बिलकूल रस नाही. विशेष म्हणजे विद्याने २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘फेरारी की सवारी’ या चित्रपटात आयटम साँग केलेले आहे.

विद्याला आवडत नाहीत आयटम साँग
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकप्रियता मिळविण्याचे माध्यम म्हणून सध्या आयटम साँगकडे पाहिले जाते. त्यामुळेच तर अनेक अभिनेत्री आयटम साँग करण्याला प्राधान्य देतात; परंतु विद्या बालनला आयटम साँग करण्यात बिलकूल रस नाही. विशेष म्हणजे विद्याने २०१२ मध्ये रिलीज झालेल्या ‘फेरारी की सवारी’ या चित्रपटात आयटम साँग केलेले आहे. विद्या म्हणते की, इच्छा नसतानाही केवळ विधू विनोदच्या इच्छेखातर त्या चित्रपटात आयटम साँग केले. आता मात्र माझी आयटम साँग करण्याची इच्छा नाही, असेही तिने स्पष्ट केले.