ती फुलराणी गाठणार शंभरीचा टप्पा

By Admin | Updated: November 18, 2016 04:51 IST2016-11-18T04:54:22+5:302016-11-18T04:51:19+5:30

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेले नाटक म्हणजे ती फुलराणी.

It will reach the hundred feet of Phulrani | ती फुलराणी गाठणार शंभरीचा टप्पा

ती फुलराणी गाठणार शंभरीचा टप्पा

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविलेले नाटक म्हणजे ती फुलराणी. या नाटकातील ती फुलराणीची भूमिका अनेक तगड्या मराठी अभिनेत्रींनी साकारली आहे. यामध्ये भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष या कलाकारांचा समावेश आहे. या अभिनेत्रींनंतर आता ती फुलराणीची भूमिका अभिनेत्री हेमांगी कवी अत्यंत यशस्वीरीत्या पार पाडतीय. तिच्या या नाटकाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळताना दिसत आहे. तिचे हे नाटक आता शंभरीचा टप्पा गाठणार असल्याचे हेमांगीने लोकमत सीएनएक्सला सांगितले. हेमांगी म्हणते, सध्या मराठी नाटकांच्या संख्येचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा या नवीन नाटकांच्या गर्दीमध्ये एखादे जुन्या नाटकाने आपले स्थान कायम ठेवणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे सध्या चित्रपट, मालिका, रिआॅलिटी शो अशा पध्दतीने मनोरंजनाची माध्यमे वाढली आहेत. ही सर्व माध्यमे असूनदेखील प्रेक्षकांचा ती फुलराणी प्रतिसाद पाहून खरेच खूप छान वाटते. तसेच आमच्या नाटकांचे निर्माते यांचेदेखील खूप कौतुक करावेसे वाटते. कारण त्यांनी ही तयारी दर्शविली. या नाटकाचा शंभरावा प्रयोग नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण हे नाटक कुठे असणार आहे अजून गुलदस्तात असल्याचे तिने या वेळी सांगितले.

Web Title: It will reach the hundred feet of Phulrani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.