या वयात काम मिळणं कठीण- अमिताभ बच्चन

By Admin | Updated: October 10, 2015 18:46 IST2015-10-10T18:44:33+5:302015-10-10T18:46:50+5:30

माझ्या वयात काम मिळणं कठीण आहे, मात्र तरीही मला थोडफार काम मिळतयं ही समाधानाची बाब आहे, जोपर्यंत शरीर साथ देतयं तोपर्यंत काम मिळत रहावं अशी माझी इच्छा असल्याचे अमिताभ बच्चन यांनी नमूद केले.

It is difficult to get work at this age - Amitabh Bachchan | या वयात काम मिळणं कठीण- अमिताभ बच्चन

या वयात काम मिळणं कठीण- अमिताभ बच्चन

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १० - उद्या (११ ऑक्टोबर) वयाची ७३ वर्षे पूर्ण करणारे बॉलिवूडचे शहेनशहा बिग बी अर्थात  अमिताभ बच्चन आजही इंडस्ट्रीतील सर्वात बिझी कलाकार आहेत. मात्र असं असतानाही 'आता या वयात उत्कंठावर्धक, मनाजोगी भूमिका मिळणं कठीण असल्याचे अमिताभ यांनी एका मुलाखतीत सांगितले. शमिताभ, पिकू या चित्रपटांच्या यशानंतर अमिताभ यांचा वजीर हा चित्रपटही थोड्याच काळात प्रदर्शित होणार आहे आणि लवकरच ते प्रेक्षकांसाठी एक नवा टीव्ही शोही घेऊन येत आहेत. 
या वयात काम मिळणं अतिशय कठीण असतं आणि याबाबतीत मी इतरांपेक्षा बिलकूल वेगळा नाहीये.  मात्र तरीही मला थोडाफार काम मिळतयं ही चांगली गोष्ट आहे, जोपर्यंत माझं शरीर साथ देतयं तोपर्यंत मला काम मिळत रहावं अशीच माझी इच्छा आहे,असे ते म्हणाले. 
यावर्षी माझे शमिताभ , पिकू हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि वजीरही लवकरच मोठ्या पडद्यावर दिसेल. वेगळीकथा आणि मांडणी यामुळे हे चित्रपट माझ्यासाठी अतिशय यशस्वी ठरले आहेत. मी एक टीव्ही शोही घेऊन येत आहे, हे सर्व एकत्र करणं कठीण असलं तरी ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे. जर मी चांगल काम केलं आणि ते प्रयत्न यशस्वी ठरले तर चांगलचं आहे, पण जर मी अपयशी ठरलो, तर त्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी मला कठोर मेहनत करावी लागेल, असही बिग बींनी सांगितलं.
 

Web Title: It is difficult to get work at this age - Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.