स्पीलबर्गच्या चित्रपटात इरफान
By Admin | Updated: November 29, 2014 23:16 IST2014-11-29T23:16:57+5:302014-11-29T23:16:57+5:30
अभिनयाची कौशल्ये दाखविणारा इरफान खान लवकरच ऑस्कर विजेते दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांच्या ‘माव्र्हल युनिव्हर्स’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

स्पीलबर्गच्या चित्रपटात इरफान
‘द वॉरियर’, ‘ए मायटी हार्ट’, ‘द अमेजिंग स्पायडरमॅन’ आणि ‘लाईफ ऑफ पाय’ यासारख्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनयाची कौशल्ये दाखविणारा इरफान खान लवकरच ऑस्कर विजेते दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग यांच्या ‘माव्र्हल युनिव्हर्स’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. एका वर्तमानपत्रला दिलेल्या मुलाखतीत इरफानने सांगितले की सध्या स्पीलबर्ग यांच्या एका चित्रपटाबाबत बोलणी सुरू आहे. इरफान लवकरच ‘जुरासिक वर्ल्ड’ या चित्रपटाचे प्रमोशन सुरू करणार आहे. स्पीलबर्ग या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.