Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 10:42 IST2025-08-15T10:41:42+5:302025-08-15T10:42:15+5:30

लोकप्रिय गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्यांना त्यांच्या गोड आवाजात सुरेल शुभेच्छा दिल्या आहेत. 

independence day 2025 singer saleel kulkarni give wishes by singing vandya vande matram | Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा

Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा

Independence Day 2025: १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपली भारतमाता पारतंत्र्यातून स्वतंत्र झाली. दरवर्षी १५ ऑगस्टला आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. आज आपण ७९वा स्वातंत्र्यदिवस साजरा करत आहोत. सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत सेलिब्रिटींनीही स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लोकप्रिय गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्यांना त्यांच्या गोड आवाजात सुरेल शुभेच्छा दिल्या आहेत. 

सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. "वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम", हे गाणं गाऊन सलील कुलकर्णींनी चाहत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गाणं गाण्यासोबतच ते पेटीही वाजवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. "वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदेमातरम...1948 सालची गदिमा आणि बाबूजी यांची ही अजरामर रचना..स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !! भारत माता की जय", असं त्यांनी कॅप्शन दिलं आहे. 


सलील कुलकर्णी यांचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चाहत्यांनीही कमेंट करत स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. सलील कुलकर्णी हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेक अपडेट्स ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतात. सलील कुलकर्णी यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटींनीही स्वातंत्र्यदिन साजरा केला. 

Web Title: independence day 2025 singer saleel kulkarni give wishes by singing vandya vande matram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.