‘फिल्मफेअर’वर ‘बाजीराव मस्तानी’ची छाप
By Admin | Updated: January 17, 2016 03:17 IST2016-01-17T03:17:11+5:302016-01-17T03:17:11+5:30
मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल, स्टेडियममध्ये काल शुक्रवारी रात्री फिल्मफेअर पुरस्कार सोहळा अगदी थाटात पार पडला. यंदाचा हा सोहळा ६१ वा होता. हा भारताच्या सिनेसृष्टीमधील

‘फिल्मफेअर’वर ‘बाजीराव मस्तानी’ची छाप
- मानाचा पुरस्कार सोहळा
मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल, स्टेडियममध्ये काल शुक्रवारी रात्री फिल्मफेअर पुरस्कार सोहळा अगदी थाटात पार पडला. यंदाचा हा सोहळा ६१ वा होता. हा भारताच्या सिनेसृष्टीमधील सर्वात जुना व मानाचा पुरस्कार सोहळा आहे. १९५४ सालापासून फिल्मफेअर पुरस्कारांचे वितरण दरवर्षी केले जाते. हे पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसोबत बॉलीवूडमध्ये प्रतिष्ठेचे मानले जातात. ‘द क्लेअर्स’ हे या पुरस्कार सोहळ्याचे मूळ नाव. द टाइम्स आॅफ इंडियाच्या समीक्षक क्लेअर मेंडोन्सा यांच्या नावावरून ते ठेवले होते. त्यानंतर पुरस्कारांचे नाव फिल्मफेअर या चित्रपट विषयाला वाहिलेल्या नियतकालिकाच्या नावावरून फिल्मफेअर अवॉडर््स असे झाले. १९५६ सालापासून फिल्मफेअर पुरस्कार विजेत्यांची निवड समितीद्वारे व साधारण जनतेद्वारे केली जाते. यंदाही बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट कलावंत-तंत्रज्ञांना गौरविण्यात आले.
‘बाजीराव मस्तानी’ या ऐतिहासिक चित्रपटाने खरंच इतिहास घडवला. अवघं बॉलीवूड आणि चित्रपटप्रेमी ज्या पुरस्कार सोहळ्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते तो ६१ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शुक्रवारी रात्री मुंबईत दिमाखात पार पडला. २०१५ मधला बहुचर्चित चित्रपट बाजीराव मस्तानीने या पुरस्कार सोहळ्यावर आपली अमिट मुद्रा उमटवली.
या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बाजीराव मस्तानीला गौरवण्यात आले. याच चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी संजय लीला भन्साली यांना सन्मानित करण्यात आले. रणवीर सिंगने बाजीराव पेशव्यांच्या भूमिकेसाठी तर दीपिका पदुकोणने पिकू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. काशीबाई साकारणाऱ्या प्रियंकाला सर्वोत्कृष्ट साहाय्यक नायिकेचा अॅवॉर्ड प्रदान करण्यात आला. मसान या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटासाठी दिग्दर्शनातील पदार्पण म्हणून नीरज घैवानला पुरस्कार मिळाला तर अभिनयातील पदार्पणासाठी भूमी पेडणेकर आणि सूरज पांचोली यांना पुरस्कार मिळाले. कंगना राणावतला तनू वेड्स मनू रिटर्न्समधील भूमिकेसाठी तर अभिनेत्यांमध्ये पिकू चित्रपटासाठी बिग बी यांना परीक्षकांचे विशेष पारितोषिक मिळाले. पिकू हा परीक्षकांच्या पसंतीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. विशेष म्हणजे पंडित बिरजू महाराज यांना बाजीराव मस्तानीतील ‘मोहे रंग दो लाल’साठी सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. श्रेया घोषालने दिवानी मस्तानीसाठी, तर अरिजीत सिंगने ‘सुरज डुबा है’साठी पुरस्कार पटकावला.
रेड कार्पेटवर अवतरले तारांगण
६१ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शुक्रवारी रात्री दिमाखात पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलीवूडचे सर्व मोठे स्टार आले होते. रेड कार्पेटवर त्यांचा जलवा पाहण्यासारखा होता. त्यांची एक अदा आपल्याला टिपता यावी, यासाठी छायाचित्रकारांची सारखी धडपड सुरू होती. कॅमेऱ्यांच्या लखलखणाऱ्या फ्लॅशमध्ये हे सर्व स्टार्स आणखी सुंदर दिसत होते. रेड कार्पेटवर ज्यांच्या सौंदर्याची खऱ्या अर्थाने चर्चा झाली त्यामध्ये परिनीती चोप्रा, मधुर भांडारकर, जॅकलिन फर्नांडिस, अर्जुन कपूर, वरुण धवन, करण जोहर यांचा समावेश होता.
-बेस्ट अॅक्टर आॅफ लीडिंग रोल (अभिनेत्री)
दीपिका पदुकोण (पिकू)
-बेस्ट अॅक्टर आॅफ लीडिंग रोल (अभिनेता)
रणवीर सिंग (बाजीराव मस्तानी)
-सर्वोत्कृष्ट चित्रपट
बाजीराव मस्तानी
-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
संजय लीला भन्साली (बाजीराव मस्तानी)
-सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक
नीरज घैवान (मसान)
-सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री
भूमी पेडणेकर (दम लगा के हैं शा)
-सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता
सूरज पांचोली (हीरो)
-समीक्षक चॉइस बेस्ट फिल्म
पिकू
-समीक्षक चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेता
अमिताभ बच्चन (पिकू)
-समीक्षक चॉइस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
कंगना राणावत (तनू वेड्स मनू रिटर्न्स)
-सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
अनिल कपूर (दिल धडकने दो)
-सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
प्रियांका चोप्रा (बाजीराव मस्तानी)
-जीवनगौरव पुरस्कार
मौसमी चॅटर्जी
-सर्वोत्तम वेशभूषा
अंजू मोदी आणि मॅक्सिमा बसू (बाजीराव मस्तानी)
-सर्वोत्तम साउंड डिझाइन
साजिद कोयन (तलवार)
-सर्वोत्तम प्रोडक्शन डिझाइन
सुजित सावंत, श्रीराम अय्यंगार आणि सलोनी धात्रक (बाजीराव मस्तानी)
-सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक
पंडित बिरजू महाराज (बाजीराव मस्तानी)
-बेस्ट सिनेमॅटोग्राफी - मनू आनंद (दम लगा के हैं शा)
-बेस्ट अॅक्शन - श्याम कौशल (बाजीराव मस्तानी)
-बेस्ट बॅकराउंड स्कोर - अनुपम रॉय (पिकू)
-सर्वोत्तम व्हीएफएक्स
प्राण स्टुडिओ (मुंबई वेलवेट)
-सर्वोत्तम पार्श्वगायिका
श्रेया घोषाल
(बाजीराव मस्तानी)
-सर्वोत्तम पार्श्वगायक
अरजित सिंग (रॉय)
-सर्वोत्तम गीत
इर्शाद कामिल (तमाशा)
-सर्वोत्तम संगीत
अंकित तिवारी (तमाशा)
-आर.डी. बर्मन पुरस्कार
अरमान मलिक
-सर्वोत्तम पटकथा
जुही चतुर्वेदी (पिकू)
-सर्वोत्तम संपादन
ए. श्रीकर प्रसाद (तलवार)
-सर्वोत्तम कथा
विजेंद्र प्रसाद
(बजरंगी भाईजान)
-सर्वोत्तम संवाद
हिमांशू शर्मा
(तनू वेड्स मनू रिटर्न्स)