कंगना-हृतिकमध्ये ‘इलू-इलू’
By Admin | Updated: February 28, 2015 23:40 IST2015-02-28T23:40:32+5:302015-02-28T23:40:32+5:30
सुझेनपासून दुरावल्यानंतर हृतिक-कंगनामध्ये जरा जास्तच जवळीक निर्माण झाली आहे.

कंगना-हृतिकमध्ये ‘इलू-इलू’
काही दिवसांपूर्वी नर्गिस फक्री, बार्बरा मोरीसोबत हृतिकचे नाव जोडले जात होते. आता मात्र सुझेनपासून दुरावल्यानंतर हृतिक-कंगनामध्ये जरा जास्तच जवळीक निर्माण झाली आहे. शिवाय, हे दोघेही आपल्या रिलेशनशिपला घेऊन सिरिअस असल्याचेही बॉलीवूडकरांचे म्हणणे आहे. दिग्दर्शक राकेश रोशन म्हणजे हृतिकच्या वडिलांनाही आपल्या मुलाने पुन्हा एकदा लग्नाचा विचार करावा असे वाटते आहे.
अर्थात, हा निर्णय हृतिकचाच असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.